Farmer scheme : शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. गतवर्षी बहुतांश भागांमध्ये पावसाचे कमी प्रमाण त्याचबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे सन 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतलेला होता. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
या अर्थसाहाय्या करता ई पिक पाहणी पोर्टल द्वारे पिकाची नोंद केलेले शेतकरीच याकरता पात्र ठरणार आहे. आता डीबीटी द्वारे थेट शेतकऱ्यांच्या सलग्न खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे. अनुदाना करता पात्र शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असून आवश्यक कागदपत्रे गावातील कृषी सहायकाकडे जमा करावी लागणार आहे.
लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Farmer scheme)
- वैयक्तिक खातेदारासाठी आधार कार्ड सेल्फ अटेस्टेड म्हणजेच स्वतः स्वाक्षरी केलेले झेरॉक्स
- संमती पत्र आवश्यक आहे
- तसेच सामूहिक खातेदारांसाठी आधार कार्ड स्वतः स्वाक्षरी केलेले झेरॉक्स
- सामूहिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र
- संमती पत्र आवश्यक असणार आहे.
वरील दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला तुमच्या गावातील किंवा तुमच्या शेताच्या शिवारानुसार असलेल्या कृषी सहाय्यक आकडे जमा करावे लागणार आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान (Farmer scheme)
ई पिक पाहणी नोंद केलेल्यांना हे अनुदान मिळणार आहे. राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी 2024 च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टल द्वारे लागवडीची नोंद केली आहे. अशा नोंदणी कृषी शेतकऱ्यांनाच हे अर्थसाह्य दिले जाणार आहे. तसेच ही अर्थसहाय्य योजना केवळ 2024 च्या खरीप हंगामा मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरता मर्यादित असणार आहे.
अशाप्रकारे मिळणार अनुदान (Farmer scheme)
कृषी विभागाद्वारे सन 2024 च्या खरीप हंगामा मधील कापूस व सोयाबीन उत्पादकांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रा करता सरसकट 1000 रुपये व त्यापेक्षा जास्त क्षेत्राकरिता प्रति हेक्टरी 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
यादीत नाव कशाप्रकारे चेक करावे (Farmer scheme)
सन 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य दिले जाणार आहे त्याकरता शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करावे लागणार आहेत पात्र शेतकऱ्यांची यादी ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयास दिली असून या संदर्भात सूचना सुद्धा दिलेले आहेत.
सहकार्य करा : शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा तुमच्याजवडील व्हाट्सअप ग्रुप मध्ये ही माहिती शेअर करून शेतकऱ्यांना सहकार्य करा.
हे पण वाचा : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: 3 मोफत गॅस सिलेंडर;असा मिळवा लाभ.!
Sheti