तुमच्या खात्यात 3000 रुपये आले नाही? या तीन गोष्टी करा आणि पैसे मिळवा! (ladaki Bahin First Installment)

ladaki Bahin First Installment : सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये पात्र महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे एकत्रित 3000 रुपये खात्यावरती जमा झालेले आहेत तसेच ज्या महिलांचे अजून खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीत त्यांची सुद्धा 17 तारखेपर्यंत पैसे बँक खात्यावरती जमा होतील. आतापर्यंत राज्य सरकारकडे तब्बल 80 लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी हस्तांतरित करण्यात आलेला आहे. कारण या योजने करता आतापर्यंत कोट्यावर्ती अर्ज आलेले आहेत. पण यामधील लाखो मुलांचे अर्ज बाद सुद्धा झालेले आहेत तर काही महिलांना अद्यापही सन्मान निधीचा हप्ता मिळालेला नाही. या सर्व गोष्टींची कारणे काय असू शकतात याबाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आपण समजून घेऊया.

पहिले मुख्य कारण (ladaki Bahin First Installment)

राज्य सरकारकडून पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्ता वरती हे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार होते मात्र त्या अगोदरच हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या मुलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत अशा अनेक महिलांकडून आनंद व्यक्त होत आहे. सरकारने असे स्पष्ट केलेले आहे की सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावरती 17 ऑगस्टपर्यंत उर्वरित पैसे जमा केले जाणार आहे. याची प्रत्यक्ष सुरुवात 14 ऑगस्ट रोजी पासून चालू झालेली असून आज म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी साधारणतः 48 लाख महिलांच्या बँक खात्यावरती पैसे पाठवण्यात आलेले आहे. ज्या मुलांच्या बँक खात्यावरती अजून सुद्धा पैसे जमा झालेले नाही अशा महिलांनी काळजी करू नये कारण त्यांचे पैसे 17 तारखेपर्यंत त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे. यामुळे पात्र महिलांनी 17 तारखेपर्यंत वाट बघावी असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे.

ladaki Bahin First Installment
ladaki Bahin First Installment
WhatsApp Group Join Now

दुसरे मुख्य कारण (ladaki Bahin First Installment)

ज्या महिलांचे बँक मध्ये पैसे जमा झाले नाही याचे मुख्य कारण म्हणजे बँक सीडींग स्टेटस. काही महिलांचे आधार नंबर आपल्या बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे या योजनेचा लाभ मिळालेला नाही. ज्या महिलांना 17 तारखेपर्यंत हे पैसे हवे असेल अशा सर्व महिलांनी आपल्या बँक खात्याशी आपला आधार नंबर लिंक करून घेणे गरजेचे आहे. तुम्हाला जर आपला आधार नंबर आपल्या बँक खात्याची लिंक आहे किंवा नाही याची तपासणी घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून करायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही चेक करू शकता.

खालील पोस्ट वरती क्लिक करून तुमच्या बँक खात्याशी तुमचा आधार नंबर लिंक आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या

लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या कोणत्या बँकेच्या खात्यात येणार? लगेच आधारकार्ड नंबर टाकून चेक करा.! 

तिसरे मुख्य कारण (ladaki Bahin First Installment)

ज्या महिलांनी अर्ज सादर करून सुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नसतील तर अशा महिलांना घाबरण्याची काम नाही कारण तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत. परंतु तुमच्या अर्जासमोर पेंडिंग, Review, Disapproved असं जर दिसत असेल तर घाबरण्याचे कारण नाही. तुमच्या अर्जाची छाननी अजून सुरू असून तुमच्या बँक खात्यावरती येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचे पैसे जमा केले जातील मात्र याकरता तुमचे अर्जाचे स्टेटस अप्रू असणे गरजेचे असणार आहे. ज्या महिलांचे अर्ज अप्रू झालेले आहे आणि त्यांना अजून सुद्धा पैसे मिळालेले नाही अशा सर्व महिलांनी 17 तारखेपर्यंत वाट बघावी त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर पैसे जमा होतील.

यादीमध्ये नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment