शेतकऱ्यांनो,बॅटरी फवारणी पंप मिळवा! मोबाईलवरून 5 मिनिटांत अर्ज करा! (Favarni Pump Yojana )

Favarni Pump Yojana : सर्व शेतकरी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. आणि शेतकऱ्यांना शेती करताना बऱ्याच महत्त्वाच्या उपकरणाची गरज भासत असते. कारण सर्व शेतकऱ्यांकडे स्वतःची उपकरणे असतील तर त्या शेतकऱ्यांना शेतीमधून चांगल्या प्रकारचा नफा मिळवता येऊ शकतो. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची उपकरणे नसतात त्यांना ती खूप करणे भाड्याने सुद्धा घ्यावी लागतात. या गोष्टीमुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो. यामुळे शेतीमधील कृषी यंत्रांची उपयुक्तता लक्षात घेऊन सरकार शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो.

राज्य पुरस्कृत एकात्मिक पिकांची उत्पादकता वाढ तसेच मूल्य साखळी विकासाकरता विशेष कृती योजना २०२४-२५ योजनेमध्ये भारतीय संचालक फवारणी यंत्र वाटप करण्यात येणार आहे. या गोष्टीचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशा प्रकारचे आव्हान करण्यात आलेले आहे.

Favarni Pump Yojana
Favarni Pump Yojana
WhatsApp Group Join Now

या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेतकऱ्यांना बॅटरी संचलित फवारणी पंप अनुदानावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे याबाबतच्या लाभाकरता खालील महाडीबीटी पोर्टल वरती शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे.

बॅटरी फवारणी पंप करता पात्रता (Favarni Pump Yojana)

  • शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
  • शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा तसेच ८ अ असणे आवश्यक
  • शेतकरी हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक असेल
  • फक्त एकाच अवजरा करता अनुदान देणारा आहे, म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/अवजारकरता
  • कुटुंबामधील नावे ट्रॅक्टर असल्यास किंवा ट्रॅक्टर चलीत अवजाराकरता लाभ मिळवण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • एखाद्या घटकाकरिता किंवा अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटकात अवजारासाठी पुढील दहा वर्षांपर्यंत अर्ज करता येणार नाही परंतु इतर जरा करता अर्ज करता येईल.

बॅटरी पंपा करता आवश्यक कागदपत्रे (Favarni Pump Yojana)

  • आधार कार्ड
  • ७/१२ दाखला
  • ८-अ उतारा
  • अवजारे खरेदी करायचे आहे त्याचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल.
  • जातीचा दाखला (अनुसूचित जाती अनुसूचित जमाती करता लागू असणार)
  • स्वयंघोषणापत्र
  • पूर्व संमती पत्र

बॅटरी फवारणी पंप अनुदान योजने करता अर्ज प्रक्रिया

  • या योजनेचा लाभ घेण्याकरता शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्ड सोबत लिंक करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याकरता खालील दिलेल्या संकेतस्थळावरती क्लिक करून द्या.
Favarni Pump Yojana
Favarni Pump Yojana

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

  • शेतकरी मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायत द्वारे आपले सरकार केंद्र इत्यादींच्या माध्यमातून सुद्धा या संकेतस्थळावरती अर्ज करू शकतो.
  • वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करून इच्छिणाऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावरती प्रमाणित करून घ्यायचा आहे.
  • ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी सर्वात अगोदर आधार नोंदणी चंद्रावरती जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टल मध्ये नमूद करून त्यांना योजने करता अर्ज करता येणार आहे.
  • अशा अर्जदारांनी अनुदान वितरित करण्याअगोदर महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागणार आहे. त्या व्यतिरिक्त त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
  • यानंतर त्यांना पुढे अर्ज करा अशा प्रकारची लिंक शोधून त्यावरती क्लिक करून घ्यायचे आहे कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरून घ्यायचे जसे की मुख्य घटक या चौकटीमध्ये क्लिक करून कृषी यंत्र अवजारांच्या खरेदी करता अर्थसहाय्य हा पर्याय निवडून घ्यायचा आहे.
  • तपशील या चौकटीवरती क्लिक करून घेतल्यानंतर मनुष्य चलित अवजारे हा पर्याय निवडून द्यायचा आहे. यानंतर यंत्रसामग्री अवजारे या पर्याय वरती क्लिक करून पीक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडून घ्यायचा आहे.
  • पुढे मशीनचा प्रकार म्हणजे बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस गळती धान्य हा प्रकार निवडून द्या.
  • योजनेमधील अटी तसेच शर्ती मान्य करण्याकरता दिलेल्या चौकटीमध्ये टिक करून घ्या आणि जतन करा या बटणावर क्लिक करा.
  • तुम्हाला अजून काही अर्ज करायचे असेल तर Yes या बटणावरती क्लिक करून घ्यायचे आहे नसेल तर No या बटणावरती क्लिक करून आपण फक्त बॅटरी संचलित फवारणी पंपा करता अर्ज करत आहोत त्यामुळे No या बटणावरती क्लिक करायचे आहे.
  • अर्ज सादर करा या बटणावरती क्लिक करून सूचना वाचून घ्या आणि ओके या बटणावर क्लिक करा

हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म Approved झाला असेल किंवा पेंडिंग असेल तर लवकर करा आहे काम.!

यानंतर आता पुढे पहा या बटणावरती क्लिक करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही जर एकापेक्षा अनेक योजना करता अर्ज केला असेल तर त्या योजनांना प्राधान्य क्रमांक द्यावा लागतो तो टाकून योजनांच्या अटी आणि शर्ती मान्य करा आणि अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून घ्यायचे आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

बॅटरी संचलित फवारणी पंपाकरता तुम्हाला 23.60 एवढे शुल्क भरावे लागणार आहे त्याकरता. Make Payment या पर्यावर क्लिक करून घ्यायचे आहे.(Favarni Pump Yojana)

त्यामुळे तुम्हाला पेमेंट करण्याचा पर्याय निवडा प्रोसेस फॉर पेमेंट (process for payment) या पर्यावरती क्लिक करून घ्यायचे आहे पेमेंट करण्याचे अनेक पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला जो सोपा वाटत असेल त्या पर्यावरती क्लिक करून पेमेंट करू शकता. यामध्ये तुम्हाला क्यू आर कोड चा सुद्धा पर्याय देण्यात आलेला आहे तो सर्वात सोपा पर्याय असून पेमेंटसाठी तो पर्याय तुम्ही निवडू शकता. यानंतर तुम्हाला पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचे आहे.

बॅटरी फवारणी पंपाच्या अर्जाचे स्टेटस कशाप्रकारे चेक करावे (Favarni Pump Yojana)

महाडीबीटी अर्ज सादर केल्यानंतर शासनाच्या वतीने दर हप्त्याला लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जाणार आहे यामध्ये जर तुमच्या अर्जाची निवड झाली तर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती एक संदेश प्राप्त होईल त्यानुसार कागदपत्रे तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे.(Favarni Pump Yojana)

तुम्हाला जर तुमच्या अर्जाची स्थिती बघायची असेल तर म्हणजेच तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घ्यायचे असेल तर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करून छाननीअंतर्गत अर्ज या पर्यावरती क्लिक करून घ्यायचे आहे.

अशाप्रकारे तुम्ही बॅटरी फवारणी पंपा (Favarni Pump Yojana) करता अर्ज सादर करू शकता याबाबत अधिक माहितीकरता कृषी विभागाने कृषी सहाय्यक कृषी प्रवेक्षक मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्यासाठी सांगितले आहे.

महाडीबीटी पोर्टल अधिकृत साईटइथे क्लिक करा
महाडीबीटी शेतकरी मोबाईल ॲपइथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी PDF फाईल डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा
हेल्पलाइन क्रमांक022-49150800

2 thoughts on “शेतकऱ्यांनो,बॅटरी फवारणी पंप मिळवा! मोबाईलवरून 5 मिनिटांत अर्ज करा! (Favarni Pump Yojana )”

Leave a Comment