लाडकी बहीण योजना फक्त या तारखेपर्यंत सुरू राहणार; देवेंद्र फडणवीस काय म्हटले बघा.! (Ladaki Bahin Yojana Last Date)

Ladaki Bahin Yojana Last Date : सध्या राज्यामध्ये लाडकी बहिणीची चर्चा सर्व दूर रंगलेली आहे. लाडकी बहीण योजनेवरून रंगलेला हा श्रेयवाद आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमी वरती महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस आयोजित कार्यक्रमांतर्गत एक समारोह उत्साहात पार पडला. विशेष बाब म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस गुलाबी जॅकेट घालून या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या गोष्टीमुळे आता महायुतीमध्ये श्रेय वादाची

लढाई सुरू झालेली आहे का? अशा चर्चांना उधाण आलेले आहे. याच दरम्यान महिलांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केलेले आहे. यावेळी एका महिलेने देवेंद्र फडणवीस यांना लाडकी बहीण योजना बंद केव्हा होणार असा डायरेक्ट प्रश्न विचारला होता यावरती देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिले याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

Ladaki Bahin Yojana Last Date
Ladaki Bahin Yojana Last Date
WhatsApp Group Join Now

लाडकी बहीण योजना या तारखेपर्यंत सुरू राहील (Ladaki Bahin Yojana Last Date)

भाजपाच्या महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील महिलांनी त्यांच्या स्वतःच्या मालवणी भाषेमध्ये ऑनलाईन माध्यमातून थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपर्क साधला. यावेळी चक्क एका महिलेने देवेंद्र फडणवीस यांना विचारले की, लाडकी बहीण योजना बंद होणार का ? अशा प्रकारची विचारणा केली, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जोपर्यंत आपले सरकार असणार आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही अशी उत्तर दिले आहे. परंतु ही योजना पुढील 5 वर्षापर्यंत सुरू राहील अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार तसेच आमदार अतुल भातखळकर व अमित साटम महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ व इतर नेते सुद्धा उपस्थित होते. त्याचबरोबर अंधेरी मध्ये पूर्वेच्या जागेवरून शिवसेना व भाजपा मध्ये असलेली रस्सीखेच व लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये रंगलेली श्रेयवादाची लढाई या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा मानला जात आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे आले किंवा नाही येथे क्लिक करून चेक करा

या कार्यक्रमाच्या वेळी भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की, आज तुम्ही दिलेल्या प्रेरणांमधून उत्तर इक व्हयक नाही आपल्या कार्यक्रमासाठी आत मध्ये बसलेल्या महिला इतक्याच महिला बाहेर सुद्धा आहे ज्या महिलांना हॉलमध्ये जागा नसली म्हणून काय झाले त्यांना आमच्या हृदयामध्ये जागा आहे महाराष्ट्र मधील भगिनी जेव्हा मला देवा भाऊ म्हणतात मला ते सर्वाधिक आवडतं. 2027 पासून होणाऱ्या निवडणुकीमध्ये महिलांची संख्या आता वाढणार आहे मोदींनी देश चालवण्याची जबाबदारी ही महिलांवर दिलेली असून या करता महिलांना सूट दिली महिलांचा चमत्कार बघा तोट्यात गेलेली एसटी फायद्यात आली काही नेत्यांनी योजनेबाबत प्रश्न केले सावत्र भाऊ तुम्हाला काही देणार नाही असे सुद्धा म्हटले

आपले पुन्हा सरकार येणार तर आपण यासाठी आणखी तरतूद करू माझ्या लाडक्या बहिणींनो चिंता करू नका जोर महायुतीचे सरकार आहे तोवर ह्या योजना बंद होऊ शकत नाही. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या 1500 रुपयांची किंमत काय कडणार लाडका मुलगा तसेच लाडकी मुलगी हे विरोधकांचे ब्रीदवाक्य आहे अशी टीका सुद्धा त्यांनी यावेळी केली

यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस असे म्हटले की आम्ही बोल बच्चन करत नाही काही लोक फक्त बोल बच्चन करत आहेत ते फक्त भाषण करत आहेत या सर्वांची तोंड रावणासारखी दिसतात दहा तोंडाने खोटं बोलणारी ही लोक आहेत. महिलांच्या बाबतीत बोलणाऱ्यांना आम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो की महिला मुली आणि आईचं प्रेम कोणीही खरेदी करू शकत नाही असेही ते यावेळी म्हटले.

Leave a Comment