नमो किसान चे 2000 रुपये आणि लाडकी बहीण चे 3000 असे मिळून घरामध्ये येणार 5000 रुपये.! (Pm Kisan Yojana)

Pm Kisan Yojana : काही दिवसा अगोदरच लाडकी बहिणी योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे. आता त्याच बरोबर शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठी खुशखबर आलेली आहे. नमो किसान महा सन्मान निधी योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांचा हप्ता जमा केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज 2000 रुपये जमा केले जाणार आहे. त्यामुळे राज्यांमधील एकाच घरात आता मिळून अशी पाच हजार रुपये जमा होणार आहे. परळी येथील कृषी महोत्सवामध्ये केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते हे पैसे वितरित केले जाणार असून याचा फायदा देशातील सर्व एक कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

Pm Kisan Yojana
Pm Kisan Yojana
WhatsApp Group Join Now

राज्य शासनाद्वारे नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानाचे वितरण करण्याकरता सुरू करण्यात येत असलेल्या पोर्टलचेही अनावरण आता करण्यात आलेले आहे. याप्रकारे आपण एकूण बघितले तर लाडक्या बहिणींच्या पाठोपाठ आता शेतकरी ही या योजने करता पात्र ठरत आहे. खूप दिवसांपासून शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागत होती मात्र शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा आता संपलेली आहे.

शासन निर्णय GR इथे बघा

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याकरता व सक्षम बनवण्याकरता सरकारने विविध प्रकारच्या योजना सुरू केलेल्या आहेत. यामधीलच एक मुख्य योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जात असते. प्रत्येक चार महिन्याच्या फरकाने हे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाच्या स्वरूपात जमा होत असते. आतापर्यंत शेतकऱ्यांना 17 हप्ते जारी करण्यात आलेले आहे.

नमो किसान योजनेचे पैसे खत्यात जमा झाले नसेल तर हे काम करा

बरेच शेतकऱ्यांचे नमो किसान योजनेचे 2000 रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेलच नाही आशा सर्व शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा या कारणामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही

अर्जातील दिलेली माहिती पुन्हा एक वेळ तपासा (Pm Kisan Yojana)

पी एम किसान योजनेचा लाभ घेण्याकरता शेतकऱ्यांनी अर्ज करताना प्रविष्ट केलेल्या तपशील तपासणे आवश्यक असणार आहे. यामध्ये अर्जदाराचे नाव लिंक आधार क्रमांक खाते क्रमांक यांसारख्या गोष्टींचा तपशील योग्यरीत्या भरणे गरजेचे आहे. कारण ज्या वेळेस ही माहिती अचूक असेल त्याच वेळेस या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोणताही शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याकरता ही सर्व माहिती एक वेळेस नक्की तपासा ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनीची पडताळणी अद्याप करण्यात आलेली नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

यादीत नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा

योजनेबाबतची माहिती कुठे मिळेल? (Pm Kisan Yojana)

योजनेविषयीच्या संबंधित अपडेट करता शेतकऱ्यांसाठी अधिकृत साईट pmkisan.gov.in या ठिकाणी व्हिजिट करून तुम्ही संबंधित माहिती चेक करू शकता. तसेच शेतकरी बांधव जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन सुद्धा एक केवायसी करू शकता. शेतकरी बांधवांना या संबंधित काही अडचणीत असेल तर हेल्पलाइन क्रमांक 155261 त्यांच्याकडून सुद्धा मदत मिळू शकता. योजनेविषयीचा तपशील जाणून घेण्याकरता शेतकरी बांधव 1800115526 या टोल फ्री क्रमांक वरती सुद्धा संपर्क करू शकता.

हे पण वाचा : तुमच्या खात्यात 3000 रुपये आले नाही? या तीन गोष्टी करा आणि पैसे मिळवा!

Leave a Comment