Crop Insurance Update : निवडणूक जवळ आल्यामुळे राज्यातील सामान्य नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी आता एका मागोमाग एक नवीन योजना राज्य सरकारकडून पुरवल्या जात आहे. त्याचबरोबर 2023 मधील खरीप हंगामामध्ये पिकांचा विमा उतरणाऱ्या जिल्ह्यामधील 4 लाख 38 हजार 203 शेतकऱ्यांपैकी नुकसान झालेल्या 3 लाख 64 हजार 799 शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3 टप्प्यात एकूण 370 कोटी 85 लाख रुपयांची रक्कम जमा केली जात आहे.
ज्या शेतकऱ्यांनी आपला पिक विमा नोंदवलेला होता अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळवून दिले जात आहे. मागील वर्षी खरीप हंगामामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील 3 लाख 28 हजार 304 शेतकऱ्यांना विमा कंपनी द्वारे 25% पर्यंत अग्रीम म्हणून 330.77 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते. मात्र यामध्ये काही शेतकऱ्यांची पीक पडताळणी पूर्ण झालेली नव्हती.
या कारणामुळे बऱ्याच लोकप्रतिनिधी व शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे भीमा कंपनीकडे प्राप्त तक्रारींची दखल घेऊन स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमांतर्गत वैयक्तिक तक्रारी धारकांना मे व जून महिन्यामध्ये दुसरा टप्पा वितरित करण्यात आलेला होता. यामध्ये अंतिम पीक कापणी प्रयोग, उत्पन्नावर आधारित निकषाच्या माध्यमातून शेवटच्या व अंतिम टप्प्यांमध्ये गत आठवड्यात 36 हजार 495 शेतकऱ्यांना 40.9 कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले.
मागील वर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये एकूण 4 लाख 38 हजार 203 शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विम उतरवलेला होता. यांच्यापैकी 83.24 टक्के म्हणजेच तीन लाख 64 हजार 709 शेतकऱ्यांना पीक विम्याचा 370.85 कोटी एवढी नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. तसेच उर्वरित ७३ हजार ४०४ शेतकरी या योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरलेले आहे.
सोयगाव वैजापूर तालुका सर्वात जास्त मदत जाहीर (Crop Insurance Update)
मागील वर्षाच्या हंगामामध्ये जिल्ह्यातून वैजापूर तालुक्यात तब्बल 82 हजार 115 शेतकऱ्यांनी आपला पीक विमा नोंदवलेला होता. यांच्यापैकी 98.84% म्हणजेच 81 हजार 164 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पिक विमा कोटी 105.457 कोटी रुपये जमा करण्यात आले. त्याचबरोबर सोयगाव तालुक्यामध्ये 20 हजार 857 शेतकऱ्यांनी आपला पिक विमा नोंदवलेला होता यांच्यापैकी 20 हजार 787 म्हणजेच 99.66% शेतकऱ्यांना 31.14 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि या आर्थिक नुकसानीचा लाभ या सर्व शेतकऱ्यांना मिळालेला आहे.
जिल्हा नुसार पिक विमा आकडेवारीची यादी (Crop Insurance Update)
तालुक्याचे नाव | विमा काढलेले शेतकऱ्यांची संख्या | विमा प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांची संख्या | टक्केवारी | शेतकऱ्यांना प्राप्त विमा रक्कम |
छ. संभाजीनगर | 34167 | 26578 | 77.78% | 24.53 कोटी रुपये |
गंगापूर | 60783 | 53878 | 88.63% | 57.86 कोटी रुपये |
कन्नड | 67196 | 58204 | 86.61% | 51.71 कोटी रुपये |
खुलताबाद | 20441 | 13877 | 67.88% | 10.10 कोटी रुपये |
पैठण | 54606 | 35743 | 65.45% | 26.44 कोटी रुपये |
फुलंब्री | 36367 | 19263 | 52.96% | 14.88 कोटी रुपये |
सिल्लोड | 61671 | 55305 | 89.67% | 48.73 कोटी रुपये |
सोयगाव | 20857 | 20787 | 99.67% | 31.14 कोटी रुपये |
वैजापूर | 82115 | 81164 | 98.84% | 105.45 कोटी रुपये |
एकूण | 438203 | 364799 | 83.24% | 370.85 कोटी रुपये |
फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वात कमी लाभ
छत्रपती संभाजी नगर मधील फुलंब्री तालुक्यामधील शेतकऱ्यांना पीक विम्याचा सर्वाधिक कमी लाभ मिळालेला आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
तालुक्यामध्ये पिक विमा काढलेल्या 36 हजार 367 शेतकऱ्यांपैकी फक्त 52.96% शेतकऱ्यांनाच या पिक विम्याची नुकसान भरपाई मिळण्याची चित्र स्पष्ट झालेले आहे.
हे पण वाचा : नमो किसान चे 2000 रुपये आणि लाडकी बहीण चे 3000 असे मिळून घरामध्ये येणार 5000 रुपये.!
शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील पिक विम्याची यादी तुम्हाला सर्वात अगोदर बघायची असेल किंवा तुमच्या जिल्ह्यातील पिक विमा अपडेट जाणून घ्यायचे असेल तर खालील व्हाट्सअप ग्रुप ला आता जॉईन करून घ्या. जेणेकरून तुम्हाला वेळेवरती सर्व माहिती तुमच्या व्हाट्सअप वरती मिळेल.