आमचा लाडका शेतकरी योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा.! (Ladka Shetkari Yojana)

Ladka Shetkari Yojana : सध्या निवडणूक जवळ आल्यामुळे नवनवीन योजनांची घोषणा सलग सुरू आहे. काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना ही सर्व दूर चर्चेत आहे. आता त्याच पाठव माझा लाडका शेतकरी ही योजना राबवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. बरं या योजनेतून नक्की शेतकऱ्यांना काय लाभ मिळेल याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा.

आमच्या सरकारचे काम म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाला थेट मार्केट देण्याचे काम आहे. आमच्या सरकारचे एकच मुख्य धोरण आहे, कष्टकरी, वारकरी, सुखी शेतकरी अशा प्रकारचे आमच्या सरकारकडून धोरण राबवले जात आहे. म्हणूनच राज्यामध्ये आम्ही लाडकी बहीण योजना आणली, त्याचपाठोपाठ (Ladka Shetkari Yojana) लाडका भाऊ योजना सुद्धा आणली आता याच अनुषंगाने आम्ही लाडका शेतकरी ही योजना सुरू करणार आहोत.

आमचा लाडका शेतकरी योजना (Ladka Shetkari Yojana)

अशा प्रकारची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज बीडमध्ये सुरू असलेल्या राज्य सरकार कृषी महोत्सवाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाकरिता केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित आहे. या कार्यक्रमांमध्ये बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेविषयीची मोठी घोषणा केली.

Ladka Shetkari Yojana
Ladka Shetkari Yojana
WhatsApp Group Join Now

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणाले की, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हे देणार आहेत त्यामुळे आज मी त्यांच्या अगोदर बोलत आहे. मी शेतकऱ्यांकरिता त्यांच्याकडे काहीतरी मागणार आहे. ते यावेळी असे सुद्धा म्हटले की, आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाणारे कार्यकर्ते आहोत आम्ही फक्त ऑफिसमध्ये बसून फेसबुक लाईव्ह नाही करत. अशा प्रकारचा जोरदार टोला सुद्धा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट येत असल्यामुळे जेव्हा नुकसान होते तेव्हा मदत करत असताना आम्ही सर्व नियम बाजूला ठेवत असतो. आमच्या महायुतीच्या सरकारने लगेच मदत देण्याचे काम सुद्धा सुरू केलेले आहे. कशा प्रकारची माहिती भाषणामध्ये बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

कांदा तसेच दूध प्रश्नावरती लवकर बैठक घेणार (Ladka Shetkari Yojana)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हटले की एक रुपयात विमा योजना देणारे हे महाराष्ट्र राज्य पहिले असणार आहे. किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याच्या मार्फत आपण मोठा निधी सुद्धा दिलेला आहे. आम्ही शेतकऱ्यांना दिलेलं कधीही बोलून दाखवत नाही. विरोधक म्हणत असतात शेतकऱ्यांना काय दिलं? मात्र आम्ही त्यांच्याकडे कधी लक्ष देत नाही. आम्हाला आज राज्यातील शेतकऱ्यांचा कांद्याचा तसेच दुधाचा मोठा प्रश्न सोडवायचा आहे.

हे पण वाचा : पीक विम्याचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 371 कोटी रुपये वर्ग, 73 हजार शेतकरी अपात्र

याकरता तुम्ही थोडा प्रयत्न करा अशा प्रकारची विनंती ही एकनाथ शिंदे यांनी शिवराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला आणि सोयाबीनला चांगला भाव मिळाला हवा. सोयाबीन हेक्टरी 5000 आणि कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत मर्यादा असणार आहे अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

त्याचबरोबर आम्ही साडेसात शेती पंपाचे(Hp) विज बिल सुद्धा माफ करणार आहोत. विरोधकांनो मागचं काय विचारत आहात आणि पुढचं बिल घेणार नाही. यापुढे आमचे सरकार शेतकऱ्याकडून विज बिल घेणार नाही, अशाप्रकारे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला आहे.

मोफत शिलाई मशीन योजना | 15 दिवसात लाभ | कागदपत्रे, पात्रता व अटी संपूर्ण माहिती

Leave a Comment