Ladaki Bahin Installment : महाराष्ट्र राज्य सरकारकडून महिला भगिनींकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. तुम्ही सुद्धा या योजने करता अर्ज केला असेल किंवा करायचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तुम्ही जर तुमचे बँक खाते आधार लिंक केले असेल तरीसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत पैसे जमा झाले नसतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एक जुलैपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये अनेक महिलांनी तुरंत अर्ज दाखल केलेले होते. मात्र आता 14 ऑगस्ट पासून अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै तसेच ऑगस्ट महिन्याचे मिळून ३००० रुपये जमा करण्यात आलेले आहेत. परंतु अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत सुद्धा पैसे जमा झालेले नाही. अशा सर्व महिला बँकेकडे धाव घेऊ लागलेले आहेत व आपले पैसे जमा का झाले नाही याची शहानिशा करू लागले आहेत. आधार बँक खाते लिंक नसेल तर ते खाते लिंक सुद्धा केलेले आहे. मात्र तरीसुद्धा अजून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही. तर नेमका गोंधळ कुठे होत आहे याविषयीची माहिती समजून घ्या.
फक्त या महिलांना पैसे मिळाले? (Ladaki Bahin Installment)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने करता ज्या महिलांनी 14 ऑगस्ट अगोदर अर्ज केले आहेत व ज्या महिलांचे बँक आधार लिंक केलेले आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. (Ladaki Bahin Installment) परंतु 31 जुलै नंतर ज्या महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक केलेले आहे अशा महिलांना जर लाभ मिळालेला नसेल तर ही खालील माहिती तुमच्यासाठी आवश्यक आहे.
तुमच्या खात्यात 3000 रुपये आले नाही? या तीन गोष्टी करा आणि पैसे मिळवा!
या कारणामुळे पैसे जमा झाले नाही (Ladaki Bahin Installment)
तुम्ही जर लाडकी बहीण योजने करता अर्ज केलेला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर होऊन सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसल्यास तुम्ही अर्ज केलेली तारीख तुम्हाला तपासावी लागणार आहे. कारण सध्या एक जुलै ते 31 जुलै दरम्यान ज्या महिलांनी अर्ज केलेले आहे अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे. परंतु ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. या मुख्य कारणामुळे महिलांच्या बँक खात्यामध्ये अजून पैसे आलेले नाही.
यामुळे जर तुम्ही एक ऑगस्ट किंवा त्यानंतर लाडकी बहीण योजने करता अर्ज दाखल केलेला असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याकरता तुम्हाला अजून थोडी वाट बघावी लागणार आहे. एक ऑगस्ट नंतर अर्ज केलेल्या महिलांकरिता त्यांचे आधार बँक खात्यासोबत लिंक असल्याची खात्री करून जर त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड बँक सोबत लिंक करून घ्यावे. अशा प्रकारचे आवाहन शासनाद्वारे करण्यात आलेले आहे.
लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये आले! तुमच्या खात्यात केव्हा येणार इथे बघा!