ओटीपी अभावी लाडक्या बहिणींना सिलेंडर मिळणार नाही ; लवकर करा हे काम (Mofat gas cylinder)

Mofat gas cylinder : राज्यामधील युती सरकारने एक जुलैपासून मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेला सुरुवात केलेली असून या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या योजनेबरोबरच लाडक्या बहिणींना आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार अशी सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र मोफत गॅस सिलेंडरची घोषणा हवेतच विरल्यासारखी दिसून येत आहे.

मोफत गॅस सिलेंडर साठी जाचक अटी ? (Mofat gas cylinder)

सरकारने लाडके बहिणींसाठी मोफत गॅस सिलेंडर योजना तर सुरू केलेली आहे मात्र यामध्ये काही जाचक अटी सुद्धा लाजलेल्या आहेत यामुळे लाडक्या बहिणीचा मोठ्या प्रमाणात मनस्ताप झाल्याचे दिसून येत आहेत. कारण सिलेंडर करता ॲप वरून ग्राहकांना बुकिंग करून त्याचा ओटीपी एजन्सीला देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. महिलांनी जर असे केले नाही तर त्या महिलांना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ दिला जात नाही. यामुळे महिला वर्गांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.

Mofat gas cylinder
WhatsApp Group Join Now

कारण सिलेंडर करता आता ओटीपी आवश्यक असणार आहे. याकरता प्रत्येक ग्राहकांकडे स्मार्टफोन असणे सुद्धा बंधनकारक असून, दिवसभरामध्ये एका मोबाईल वरून एकच ग्राहकाची बुकिंग होत आहे. त्यामध्ये मोफत तीन सिलेंडर करता महिलांच्या नावे सिलेंडर असणे आवश्यक आहे

आपण जर बघितले तर ग्रामीण भागांमध्ये बहुतांश महिलांकडे स्मार्टफोन नाहीत. असला तरी पुरेशी माहिती नसल्यामुळे सिलेंडरची ऑनलाईन बुकिंग करता येत नाही. यामुळे अशा महिलांना बुकिंग करून ओटीपी कशा पद्धतीने मिळवायचा व सिलेंडर घ्यायचा कसा अशा प्रकारचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. शासनाकडून उज्वला योजनेच्या अंतर्गत घरोघरी प्रत्येक महिलांना सिलेंडरचे वितरण केले जाते.

हे काम आताच करा इथे क्लिक करा

सरकारकडून गॅस सिलेंडरचे दर वाढवल्यामुळे परिस्थिती नसताना सुद्धा महिलांनी कसेबसे करून त्यांचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. कुठल्याही लाडक्या बहिणींची शासनाकडे मोफत सिलेंडरची मागणी केलेली नाही केवळ विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मोफत गॅस सिलेंडरचे गाजर दाखवण्यात आले परंतु गॅस सिलेंडर तर दिलेच नाही उलट सिलेंडर वितरणाची पद्धती क्लिष्ट करून ठेवली आहे.

सबसिडी मध्ये सुद्धा दुजाभाव (Mofat gas cylinder)

उज्वला गॅस धारक व सर्वसाधारण लाभार्थी यांच्या सबसिडीमध्ये मोठी तफावत असून जवळपास 300 रुपयांच्या फरकाने सबसिडी जमा होत असल्याने महिलांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. सर्व लाभार्थ्यांना समान सबसिडी द्यावी व ओटीपी ची हॉट रद्द करावी नाहीतर ओटीपी ची जबाबदारी एजन्सीकडे द्यावी अशा प्रकारची मागणी महिलांनी केलेली आहे.

लवकर करा हे काम

ज्या महिलांनी लाडके बहिण योजनेचा अर्ज केलेला आहे किंवा उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर घेतलेले आहे अशा सर्व महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर सरकारकडून मोफत दिले जाणार आहे. मात्र यामध्ये काही जाचक अटी सरकारकडून निर्माण करण्यात आलेल्या असून ज्या महिलांनी अद्यापही आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा सर्व महिलांनी सर्वात अगोदर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.

Leave a Comment