kapus Soybean anudan EKYC : शेतकऱ्यांसाठी सरकारकडून खरीप हंगाम 2023 करिता अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. हे अनुदान कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र सरकारकडून काही अटी घातल्या गेल्या आहे. जसे की शेतकऱ्यांनी आपली इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. तुम्ही जर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुमच्या जवळील कृषी कार्यालयाशी संपर्क करून इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. अशा प्रकारचे आव्हान कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता अर्थसहाय्य योजने माध्यमातून पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे या पोर्टल वरती पीक निहाय तसेच गावनिहाय वैयक्तिक खातेदारांची लाभार्थी यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. याचबरोबर तुम्हाला घरबसल्या तुमची ई केव्हाची प्रक्रिया सुद्धा आता पूर्ण करता येणार आहे. चला तर आपण जाणून घेऊया तुम्ही तुमच्या मोबाईल वरून घरबसल्या इ केवायसी प्रक्रिया पूर्ण कशी करू शकता.
कापूस सोयाबीन अनुदानाकरता अशाप्रकारे करा ई केवायसी (kapus Soybean anudan EKYC)
राज्यामधील सन 2023 खरीप अंगामध्ये शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तसेच पिकाला मिळालेला कमी भाव यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे अनुदान वितरित केले जाणार आहे.या योजनेअंतर्गत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्राकरिता सरसकट हजार रुपये तसेच 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000 रुपये म्हणजे दोन हेक्टर च्या मर्यादेमध्ये अर्थसाह्य प्रदान करण्यात येणार आहे. म्हणजे तुमच्याकडे जर दोन हेक्टर पेक्षा अधिक जमीन असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 10,000 हजारापर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
हे अर्थसाह्य खातेदारांच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा करण्यात येणार आहे. याकरता सर्वसाधारण 96 लाख खातेदारांपैकी 68 लाख खातेदारांनी आपले आधार संमती दिलेली आहे. यापैकी नमो शेतकरी महासंबंधी योजनेअंतर्गत 46.68 लाख आधार क्रमांक जोडलेले आहेत. या सर्वांची ई केवायसी करण्याची आवश्यकता नाही.
परंतु ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी करायची आहे त्यांची यादी गावामध्ये प्रदर्शित करण्यात आलेली आहे या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकेकडे संपर्क करून आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तसेच शेतकरी सुद्धा घरबसल्या आपली ही केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
घरबसल्या मोबाईल वरून अशा प्रकारे करा इ केवायसी
याकरता दिलेले वेबसाईट तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला disbursement Status या पर्यावरणातील क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर आधार क्रमांक विचारला जाईल तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे.
त्यानंतर दिलेला कॅपच्या कोड खालील रकाने मध्ये भरून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला त्याखाली OTP अशा प्रकारचे ऑप्शन दिसेल तुमच्या आधारला संलग्न असलेल्या मोबाईल वरती ओटीपी मिळेल तो ओटीपी टाकून तुम्हाला सबमिट वरती क्लिक करायचे आहे. अशाप्रकारे ओटीपी बेस्ट तुम्ही तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. तुम्हाला काही अडचण येत असल्यास former e KYC अशा प्रकारचे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून संपूर्ण माहिती सुद्धा चेक करू शकता.
तुमच्या जवळील सीएससी सेंटर वर जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा
अधिकृत वेबसाईट ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा
शासनाकडून या ठिकाणी दोन पर्याय तुम्हाला मिळत असतात वरती आपण तुम्हाला सांगितले तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून OTP बेस ई केवायसी कशाप्रकारे करू शकता. तसेच तुम्हाला या ठिकाणी दुसरा पर्याय Biometric ई केवायसी करण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील सीएसएस सेंटर वरती जाऊन पूर्ण करता येणार आहे.
सरकारकडून तारीख जाहीर लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता या दिवशी मिळणार सविस्तर माहिती बघा.!
अशाप्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमची इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी ग्रुप वर शेअर करा.