Cotton Subsidy 2024 : मागील वर्षी खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन तसेच कपाशी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार द्वारे प्रती हेक्टर 5000 रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे. परळी जिल्हा बीड या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शना अंतर्गत केंद्रीय कृषिमंत्री शिवराय चव्हाण व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभाची वाटप करण्यासाठी पोर्टलचे आवरण करण्यात आले आहे.
मागील वर्षी झालेल्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन तसेच कापसाच्या दरामध्ये प्रचंड घसरन झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. अशा सर्व शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी सरकारकडून 5 हजार रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे अशा प्रकारची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये सुद्धा केली होती.
याच्यानुसार शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये तर दोन हेक्टर च्या मर्यादित जास्तीत जास्त दहा हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. याविषयीच्या शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. मी मदत देण्याकरता राज्य सरकार द्वारे एकूण 4 हजार 194 कोटी रुपये 86 लाख रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. यामधील 1548 कोटी 34 लाख रुपये हे कापूस तर 2 हजार 646 कोटी 34 लाख रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता वितरित केले जाणार आहे.
हे पण वाचा : सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या तारखेपासून अनुदान वितरणास सुरुवात.!
सोयाबीन व कापूस पिकाचे अनुदान मिळणार किंवा नाही अशा प्रकारे चेक करा (Cotton Subsidy 2024)
- सर्वात अगोदर तुम्हाला पुढील अनुदान वेबसाईट वरती क्लिक करून ती वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. https://scagridbt.mahait.org/
- सोयाबीन व कापूस अनुदान वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला वरती लाल चौकोनामध्ये Desbursement status वर क्लिक करा
- इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून कॅपच्या कोड इंटर करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला Get Aadhaar OTP यावरती क्लिक करून द्या.
- त्यानंतर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीचे अपडेट बाबतची सविस्तर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल.
अशाप्रकारे तुम्ही सोयाबीन व कापूस पिकाचे अनुदान मिळणार किंवा नाही याविषयीची सविस्तर माहिती वरील ते फॉलो करून चेक करू शकता.