अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांसाठी सरकारने पंतप्रधान पिक विमा योजना राबवली. ज्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा भेटलेला आहे. एक महिन्याच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठे घट दिसून आलेली आहे ती भरून काढण्यासाठी सरकारने पंतप्रधान पिक विमा योजना राबवली आहे.
या योजनेमध्ये महाराष्ट्रातील जवळपास 16 जिल्ह्यांचा समावेश होतो ज्यामध्ये 27 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे त्यामध्ये 1352 कोटी रुपये सरकार शेतकऱ्यांना येथे देणार आहे. पंतप्रधान पिक विमा योजनेमध्ये विमा कंपनी शेतकऱ्यांना त्यांच्या रकमेची 75% रक्कम देण्यास तयार झालेली आहे. पण काही जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांचा निर्णय हा त्याने थांबवलेला आहे तर त्यांच्याशी सरकार सोबत बोलणे चालू आहे आणि लवकरच यावर सरकार कंपन्याशी संवाद साधणार आहे.
अवकाळी पावसामुळे 28 जिल्ह्यांमधील पीक उत्पन्नामध्ये 50% हून अधिक घट इथे दिसून आलेली आहे या नुकसानाचे सर्वेक्षण कृषी विभागाने केले होते या सर्वेक्षणावरून सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
या योजनेमध्ये सरकारने काही सुधारणा केलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ सेवा पोहोचण्याचे काम होईल.
अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची तात्काळ पाहणी करून शेतकरी अडचणीत असतील त्यांना त्या अडचणीतून बाहेर काढण्याचे काम सरकारची चालू आहे.
महाराष्ट्रातील बुलढाणा आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसानाची आदेश सूचना मान्य केली गेलेली आहे त्यामुळे नुकसानाची किंमत विमा कंपनी त्यांच्या बँक अकाउंट मध्ये टाकणार आहे मात्र वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई चा निर्णय अद्यापही पूर्ण झालेला नाही आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक संकटेत सापडलेली आहे त्यांच्या मदतीसाठी सरकारने ही योजना राबवलेली आहे.