Farmer Scheme 2024 : राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मागील वर्षी 2023 मध्ये सोयाबीन तसेच कापूस पिकाचे नुकसान झाल्यामुळे तसेच शेतकऱ्यांवर उडवलेल्या आर्थिक संकटामुळे ही पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान जाहीर केलेले आहे. या अनुदानाची वितरण हे शेतकऱ्यांना या तारखेपासून देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात या तारखेपासून अनुदान वाटप (Farmer Scheme 2024)
शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पाच हजार रुपयाची अनुदान 21 तारखेपासून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या महाडीबीटी द्वारे बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे. मात्र याकरता शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न केलेले असावे.
ज्या शेतकऱ्यांचे सामूहिक क्षेत्र आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती (Farmer Scheme 2024)
सामाजिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये राज्य शासनाद्वारे एका शेतकऱ्याच्या नावाची सहमती पत्र तसेच त्यांचा आधार संलग्न कन्सेंट मागवण्यात आलेला आहे. याकरता आवश्यक प्रक्रिया सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे.
खरीप हंगाम 2023 या अंतर्गत सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरता अनुदान वितरणाच्या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या यादीत झालेल्या त्रुटींमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे.
बरेच शेतकऱ्यांची यादी मध्ये नावे नाही (Farmer Scheme 2024)
जमाबंदी आयुक्ताच्या अंतर्गत कृषी विभागाला एपीक पाहणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांना ग्रामीण स्तरावर ती याद्या जाहीर करण्यात आलेल्या होत्या. मात्र या याद्यांमध्ये बरेच शेतकऱ्यांची नावे गायब असल्याचे चित्र दिसून आले आहे. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. काही ठिकाणी कृषी सहायकांवरती मारहाणीचे प्रकरणे सुद्धा समोर येत आहे.
या सर्व गोंधळामुळे कृषी विभागाद्वारे काम बंद आंदोलन सुद्धा सुरू झाले होते. योजनेअंतर्गत तांत्रिक त्रुटी असल्याने जामबंदी आयुक्ताच्या निदर्शनास आले आहे. या सर्व गोष्टीमुळे शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारणे तात्पुरते थांबवलेले आहे.
नवीन याद्या लवकरच प्रसिद्ध होणार (Farmer Scheme 2024)
बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली इफिक पाहण्याची प्रक्रिया सुद्धा केलेली आहे व त्यांच्या सातबारे वरती त्याची नोंद सुद्धा झालेली आहे मात्र अशा शेतकऱ्यांचे सुद्धा यादीमध्ये नाव नसल्यामुळे नवीन याद्या जाहीर केल्या जाणार आहे. अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावरती ज्या बँक खात्याला आधार संलग्न आहे अशा खात्यावरती पैसे जमा करून दिल्या जाणार आहे तसेच सामूहिक क्षेत्र असेल तर क्षेत्रधारकांची माहिती सुद्धा जमा करावी लागणार आहे.
कृषी विभागाकडे लवकरच डेटा सुपूर्द (Farmer Scheme 2024)
लवकरच कृषी विभागाकडे नवीन डेटा सुपूर्द केला जाणार आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर डेटा दिला जाईल तितक्याच लवकर नवीन याद्या जाहीर होतील व शेतकऱ्यांची पात्रता निश्चित होऊन त्यांच्या अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल.
हे पण वाचा : शेतकऱ्यांच्या हातात 50 हजार! KYC करून अनुदान मिळवा
21 ऑगस्ट पासून अनुदानाला सुरुवात झालेली आहे (Farmer Scheme 2024)
आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचा डेटा कृषी विभागाकडे जमा झालेला आहे, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 21 ऑगस्ट 2024 पासून अनुदान त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये सुरू होण्यास सुरुवात झालेली आहे. या पहिल्या टप्प्यातील अनुदानाच्या प्रक्रिये करता 4192 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
पिक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आपली इ पिक पेरा नोंदणी पूर्ण करून घ्यावी. कारण यानंतर ज्या शेतकऱ्यांची ई पिक पाहणी पूर्ण झालेली आहे. अशा शेतकऱ्यांना अनुदान तसेच वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.