farmer subsidy announce : प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते. विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो, यामध्ये अवकाळी पाऊस अतिवृष्टी गारपीट पूर परिस्थिती, पिकांवरती आलेली रोगराई अशा अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी तसेच नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना अनुदान व नुकसान भरपाई देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
गेल्या वर्षीच्या बाबत बोलायचे झाल्यास खरीप हंगामामध्ये कापूस तसेच सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कारण सुरुवातीला अपेक्षित असा पाऊस झालेला नव्हता. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची पेरणी उशिरा झाली. त्यामध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा सुद्धा मोठा खंड बघायला मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे प्रमाण दिसणारे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेला थोडा शेतीतील माल त्याला सुद्धा योग्य दर मिळाला नाही. यामुळे शेतकरी राजा मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान (farmer subsidy announce)
शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र ही मदत शेतकऱ्यांना देताना ज्या शेतकऱ्यांनी आपली ही पिक पाहणी ची नोंद ज्या शेतकऱ्यांनी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई ची मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरता शेतकऱ्यांनी खालील गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
लवकर करा हे काम (farmer subsidy announce)
बऱ्याच वेळा सरकारकडून नुकसान भरपाई, पिक विम्याचे पैसे किंवा इतर योजनांचे पैसे पाठवले जातात मात्र ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही तुमचे इ केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे किंवा नाही हे तुम्हाला तपासणी गरजेचे आहे. खूप वेळेस तुम्ही पात्र असून सुद्धा तुमच्या खात्यात रक्कम जमा होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या. तुम्हाला बँक मध्ये जाऊन तुमच्या बँक खात्याशी जोडलेले आधार लिंक आहे किंवा नाही याची सुद्धा खात्री करून घेणे गरजेचे आहे. तर ही नुकसान भरपाई ची मदत तुम्हाला हवी असेल तर तुमच्या खात्याची ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणे तुम्हाला आवश्यक असणार आहे.
हे पण वाचा : शेतकऱ्यांनो,बॅटरी फवारणी पंप मिळवा! मोबाईलवरून 5 मिनिटांत अर्ज करा!
शेतकऱ्यांच्या गावानुसार याद्या जाहीर (farmer subsidy announce)
शासनाकडून लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा करण्यात येणार आहे. याकरता जिल्हा निहाय याद्या तयार असून लवकरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल अशी कृषी विभागाकडून माहिती देण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये सोयाबीन तसेच कापूस दरामध्ये प्रचंड घसरण झालेल्या शेतकऱ्यांकरिता ही मोठी आर्थिक मदत ठरणार आहे.
यादीमध्ये नाव बघण्यासाठी येथे क्लिक करा
राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अर्थसंकल्प धोरण जाहीर करत असताना शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रती हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान जमा होणार अशी माहिती सुद्धा दिली होती. यानुसार किमान एक हजार रुपये व दोन हेक्टर पेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आलेले होते.
शासन निर्णय जाहीर (farmer subsidy announce)
राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या लाभाबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्य सरकारला एकूण 4194 कोटी 67 लाख रुपयांचा निधी याकरता वितरित करण्यात येणार आहे. यामधील 1548 कोटी 34 लाख रुपये कापूस तर 2646 कोटी 34 लाख रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहे.