Hawaman Andaj : राज्यामध्ये पावसाचे पुन्हा आगमन झालेले असून संपूर्ण राज्यामध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केलेली आहे. हवामान विभागाबरोबर पंजाबराव डक यांचा नवीन अंदाज समोर आलेला आहे. या अंदाजानुसार शेतकऱ्यांची मका सोयाबीन पीक भिजू शकते. तसेच शेतकऱ्यांना परतीच्या पावसामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा प्रकारचा अंदाज पंजाबराव डक यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
पुढील आठ दिवस पाऊस सुरू राहणार
त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कारण आज पासून पुन्हा पाऊस कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. तब्बल येणारे 8 दिवस हा हा पाऊस महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये भाग पडत बसणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन मका व कापूस पीक असेल अशा शेतकऱ्यांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
सध्या स्थितीमध्ये नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये हवामान अंदाजानुसार पाऊस पडलेला आहे पुणे विभागाच्या हवामान अंदाजानुसार आज नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावणार आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकटासह आज पाऊस कोसळायला सुरुवात झालेली आहे. मात्र इथून पुढे पावसाचा जोर अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र मधील अनेक भागांमध्ये मका सोयाबीन पीक आता काढणीला आलेले असून शेतकऱ्यांना सोयाबीन मका काढून त्यामध्ये कांदा लागवड करायची आहे तर परत पुन्हा काही शेतकऱ्यांना मका लागवडीला सुरुवात करायची आहे मात्र मका आणि सोयाबीन पीक जर कापणी झाली आणि ते जर पावसात भिजले तर संपूर्ण शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार 412 कोटींची पिक विम्याची 25% अग्रीम रक्कम.!
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की निसर्गाचा कुठलाही नियम नसतो पाऊस किती आणि कसा पडतो याबाबत कुणीही पारदर्शकपणे ठरवून सांगू शकत नाही. परंतु मिळालेल्या हवामान अंदाज अनुसार परतीचा पाऊस जोरदार तांडव करणार असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे.
कुठल्या भागामध्ये जोरदार पाऊस होणार?
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडा उत्तर महाराष्ट्र नाशिक धुळे जळगाव नंदुरबार पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणातील काही भागांमध्ये संपूर्ण राज्यात भाग बदलत बदलत पाऊस सुरू राहणार आहे. यामध्ये विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तसेच सर्व नागरिकांनी विजा होत असेल तर झाडाखाली थांबू नये जोरदार पाऊस सुरू झालेला असेल तर घराबाहेर पडू नये अशा प्रकारच्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.