लाडक्या बहिणीचे 3000 मिळाले नाही ; हे काम करा आणि पैसे खात्यात जमा.! (Ladaki Bahin Yojana News)

Ladaki Bahin Yojana News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुरू झालेली असून बऱ्याच बहिणींना पैसे मिळालेले आहे मात्र उर्वरित ज्यांचे अर्ज बाकी आहेत अशा बहिणींना अजून सुद्धा पैसे मिळाले नाही. अशा सर्व बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. तुम्ही जर दिलेले काम पूर्ण केले तर तुमचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यात लवकरात लवकर जमा होतील. त्यामुळे दिलेली माहिती सविस्तरपणे व्यवस्थित रित्या वाचा

Ladaki Bahin Yojana News
Ladaki Bahin Yojana News
WhatsApp Group Join Now

सर्वात अगोदर खालील माहिती जाणून घ्या

लाडक्या बहिणीचा अर्ज मंजूर झाला असल्यास व बँक खात्यावरती पैसे जमा न झाल्यास सर्वप्रथम तुम्हाला तुमच्याजवडील सर्व बँक खाते तपासून घ्यायचे कारण अर्ज करताना कोणतीही बँक खाते दिले असले, तरीसुद्धा ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल त्या बँक खात्यावरती निधी जमा होणार आहे. त्याचप्रमाणे 3 ऑगस्ट नंतर ऑनलाईन अर्ज केला असेल तर एसएमएस द्वारे अर्जाचा BEBE क्रमांक प्राप्त होतो. त्याचप्रमाणे आपला अर्ज मंजूर अथवा नामंजूर झाल्याचा तुमच्या मोबाईल वरती संदेश सुद्धा प्राप्त केला जातो. अर्ज नामंजूर झालेला असेल तर त्या ठिकाणी अर्ज ऑनलाईन केला असेल तिथून पुन्हा अर्ज सबमिट करावा व मदत कक्षा संपर्क करावा. त्यानंतर आपला अर्ज मंजूर होऊन पुढील प्रक्रिया करण्यात येईल असे केल्यास तुमचे माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरात लवकर खात्यावरती जमा होईल.

बँक खात्याशी आधार लिंक असल्यावर सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाही, लवकर करा हे काम.!

तुमचे आधार सिडींग तपासा Ladaki Bahin Yojana News

  • योजनेच्या लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या कोणत्या बँकेच्या खात्यात येणार? लगेच आधारकार्ड नंबर टाकून चेक करा.! इथे क्लिक करून आधार लॉगिन करावे. आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर ओटीपी जाईल.
  • त्यानंतर बँक सिडिंग स्टेटस वर क्लिक करून तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खाते ची लिंक आहे ते तपासून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या आधार कार्ड बँक सिडिंग ऍक्टिव्ह आहे किंवा नाही याची सुद्धा खात्री करून घ्या.
  • जर आपले बँक खाते ऍक्टिव्ह नसल्यास बँकेत जाऊन आधार सिडिंग करून घ्यावी. तुमच्या आधारसेडिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत.

लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या कोणत्या बँकेच्या खात्यात येणार? लगेच आधारकार्ड नंबर टाकून चेक करा.! 

बऱ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झालेले असून ज्या महिलांच्या बँक खात्यात अद्याप लाभ मिळालेला नाही अशा सर्व महिलांनी वरील दिलेली माहिती पूर्णपणे व्यवस्थित रित्या वाचून कामे पूर्ण करून घ्यावी जेणेकरून अशा सर्व महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळेल. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त शेअर करा.

1 thought on “लाडक्या बहिणीचे 3000 मिळाले नाही ; हे काम करा आणि पैसे खात्यात जमा.! (Ladaki Bahin Yojana News)”

Leave a Comment