लाडकी बहिणी योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार? सरकारची मोठी घोषणा.! (Ladki bahin Yojana 3rd installment)

Ladki bahin Yojana 3rd installment : लाडकी बहीण योजने करता पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन हप्त्याचे 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहे. लाडक्या बहिणींना हे पैसे जुलै व ऑगस्ट अशा दोन महिन्यांची मिळून 3000 रुपये जमा झालेले आहे.ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले आहे अशा महिलांना सुद्धा तीन हप्त्याची रक्कम खात्यामध्ये केव्हा जमा होणार याची वाट बघत आहे. तर आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार? हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या समजेल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचे मिळून तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे. परंतु तिसरा हप्ता कधी येणार याकडे सर्वच महिलांचे लक्ष लागून आहे. मात्र महिलांसाठी आताची मोठी व आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण नुकताच मुख्यमंत्री यांचा महाराष्ट्र मध्ये बुलढाणा जिल्ह्यात 19 सप्टेंबर रोजी मोठा मेळावा घडून आला. याप्रसंगी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांना वेगवेगळ्या स्तरावरती माहिती दिलेली आहे. यावेळी त्यांनी महिलांना काय सांगितले आपण थोडक्यात जाणून घेऊया.

Ladki bahin Yojana 3rd installment
Ladki bahin Yojana 3rd installment
WhatsApp Group Join Now

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हटले? (Ladki bahin Yojana 3rd installment)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये दौरा जाहीर केला होता. या कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या काळामध्ये महिलांना मिळत असलेल्या 1500 रुपयांच्या मानधनामध्ये अधिक वाढ करण्याबाबत सुद्धा त्यांनी यावेळी आश्वासने दिले आहे.

माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत (Ladki bahin Yojana 3rd installment)

ज्या महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजने करता अर्ज केलेले आहे व त्या महिलांचे अर्ज अप्रू झालेले आहे अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये DBT ॲनिमल असेल तर त्याच महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे. बऱ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये पहिल्या व दुसऱ्या हप्त्याची रक्कम आतापर्यंत सुद्धा जमा झालेले नाही. अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये पहिला दुसरा आणि तिसरा हप्त्याचे एकूण 4500 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

यादीत नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा

लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 14 ऑगस्ट 2024 रोजी पासून माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती. यामध्ये ज्या महिलांचे अर्ज अप्रूव झालेले आहे आणि त्यांची DBT खाते ENEBEL आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये दोन हप्त्याची रक्कम जमा झालेली होती मात्र आता महिलांचा तिसरा हप्ता कधी येणार याबाबत सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे.

तिसरा हप्ता या दिवशी जमा होणार

ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे आणि त्यांचे खाते DBT एनेबल आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये मीडिया रिपोर्ट अनुसार 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये पैसे जमा होणार असल्याचे सांगितले गेले होते. यानुसार आज पासून महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याची रक्कम जमा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु शासनाद्वारे अधिकृत तिसऱ्या हप्त्याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे ही माहिती शाश्वत असून सोशल मीडिया रिपोर्ट अनुसार ही माहिती समोर येत आहे.

Leave a Comment