Ladki Bahin Yojana 3rd installment : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. लाडकी बहिणीच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. याविषयीची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजने करता पात्र ठरत असलेल्या महिलांना प्रति महा 1500 रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहेत.
अदिती तटकरे यांनी काय म्हटले बघा
सरकारच्या या निर्णयाविषयी मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीचा तिसरा कार्यक्रम हा 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम असणार आहे.या कार्यक्रमांतर्गत सप्टेंबर पर्यंत आलेल्या अर्जांचा लाभ वितरित करण्यात येणार आहे. अर्जामध्ये त्रुटी असल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही.त्यामुळे या तिसऱ्या हप्त्यामध्ये अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे. या तिसऱ्या हप्त्यामध्ये एकूण दोन कोटी महिलांना लाभ देण्यात येणार आहे. अशा प्रकारची माहिती अदिती तटकरे यांच्यामार्फत देण्यात आलेले आहे.
आतापर्यंत महिलांना दोन हप्ते मिळाले
मुख्यमंत्री माझी लाडकी वहिनी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना कागदपत्रांमध्ये कुठलीही त्रुटी नसलेल्या व त्या या योजनेकरता पात्र आहेत अशा महिलांच्या खात्यावरती जुलै व ऑगस्ट महिन्याचे मिळून दोन हप्ते जमा करण्यात आलेले आहेत.काही मुलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये आलेले आहेत. सरकार द्वारे पुणे शहरामध्ये मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये काही महिलांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये आलेले होते. तसेच दुसरा कार्यक्रम नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला होता.या कार्यक्रमांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याविषयी वाटप चालू करण्याबाबत सांगण्यात आले होते. तसेच रायगडे ते आता लाडकी वहिनीचा तिसरा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्ता वाटपाविषयी माहिती देण्यात येणार आहे
हे पण वाचा : ओटीपी अभावी लाडक्या बहिणींना सिलेंडर मिळणार नाही ; लवकर करा हे काम
30 सप्टेंबर पर्यंत महिलांना अर्ज करता येणार
च्या मुलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा महिलांनी 30 सप्टेंबर पर्यंत आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. महिलांना ही रक्कम डीबीटी अंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे.