लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मिळवण्याकरता तुमचा आधार क्रमांक बँक खात्याची लिंक कसा करायचा जाणून घ्या A टू Z माहिती.! Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने करतात सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये राज्य सरकारकडून जुलै व ऑगस्ट अशा २ महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये पाठवले जात आहे. आतापर्यंत एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यामध्ये ३ हजार रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. दररोज या योजनेचा लाभ घेण्याकरता अनेक महिला अर्ज करत आहेत. परंतु बऱ्याच महिलांचा त्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

कारण ज्या महिलांचे बँक खात्याचे आधार नंबर लिंक असेल तरच हे पैसे बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. एका अहवालानुसार आधार क्रमांक व बँक खाते एकमेकांशी लिंक नसल्यामुळे साधारणतः 27 लाख पात्र महिलांना या योजनेचे पैसे खात्यावर जमा झालेलेच नाही. तेवढ्यात एस पासून वरती घरबसल्या आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी लिंक कशा पद्धतीने करायचा याविषयीची सविस्तर माहिती या लेखाद्वारे आपण समजून घेऊया.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana
WhatsApp Group Join Now

आधार बँकेला लिंक आहे किंवा नाही याची खात्री करा Ladki Bahin Yojana

तुम्हाला सर्वात अगोदर माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना तुम्ही दिलेल्या बँक खाते हे आधार क्रमांक ची लिंक आहे किंवा नाही हे तपासने गरजेचे आहे. हे कशाप्रकारे तपासावे याविषयीची सविस्तर माहिती आपण या अगोदर सुद्धा दिलेली आहे तुम्हाला सुद्धा तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक सोबत लिंक आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर माहिती वाचून तुम्ही चेक करू शकता.

तुमच्या बँकेला आधार लिंक आहे किंवा नाही इथे क्लिक करून चेक करा

आपल्या बँकेला आधार क्रमांक कसा लिंक करायचा ? Ladki Bahin Yojana

  • सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती गुगल ओपन करून NPCI असे सर्च करून घ्यायचे आहे
  • यानंतर तुम्हाला NPCI अधिकृत वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे
  • यानंतर तुम्हाला Consumer या ऑप्शन वरती क्लिक करून द्यायचे आहे
  • त्यानंतर तुम्हाला Bharat Aadhar Seeding या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे
  • यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावरती तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर Request For Aadhar Seeding या ऑप्शनवर क्लिक करून द्यायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या बँकेला तुमचे आधार लिंक करायचे आहे त्या बँकेचे नाव तुम्हाला निवडून घ्यायचे आहे आणि खाली fresh seeding या पर्यावरण क्लिक करून घ्यायचे आहे.
  • तुम्ही तुमची बँक निवडल्यानंतर आता तुम्हाला अकाउंट नंबर टाकून द्यायचा आहे.
  • यानंतर तुम्हाला टॉम अँड कंडिशन वाचून त्याचा स्वीकार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कॅपच्या कोड व्यवस्थित रित्या भरून सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचे आहे.

अशाप्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक सोबत लिंक करून लाडक्या बहिणीचे पैसे बँक खात्यावरती घेऊ शकता.

लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment