Ladki Bahini Yojana First installment : महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या माजी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून पहिला हप्ता लवकरच महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया जमा करून चाचणी सुद्धा करण्यात आलेली आहे. राज्यातील महिला व बालविकास महा विभागाच्या अंतर्गत ही योजना राबवली जाणार असून ही चाचणी यशस्वीपणे पार पडली याविषयीची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा जमा होणार? (Ladki Bahini Yojana First installment)
या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी तीस लाख 29 हजार 980 अर्ज पात्र झालेले आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यामध्ये असून येणाऱ्या 16 किंवा 17 ऑगस्ट रोजी सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा लाभ जमा करण्यात येणार आहे अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. ज्या महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया जमा करण्यात आलेला होता तो फक्त पडताळणी करण्यासाठी पाठवण्यात आलेला होता. ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याविषयीचे कुठलेही गैर मेसेज किंवा अप्रचाराला तुम्ही बळी पडू नये असे यावेळी देखील शासनाकडून आव्हान करण्यात आलेले आहे.
कोणत्या महिलांना मिळणार पहिला व दुसरा हप्ता
आता बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडलेला आहे की आमच्या खात्यावरती एक रुपया जमा झालेला नाही किंवा आमचा अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर अप्रू झालेला आहे तर आम्हाला या योजनेचा लाभ मिळणार का? किंवा आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार का? (Ladki Bahini Yojana First installment) तर सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या महिलांचे आतापर्यंत अर्ज अप्रू झालेले आहे म्हणजेच मंजूर झालेले आहे. अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये पहिला व दुसरा हप्ता असे मिळून ३ हजार रुपये जमा करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी (Ladki Bahini Yojana First installment)
सर्व महिलांना सुचित करण्यात येते की, आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे. अशा सर्व महिलांचे नाव लाभार्थी यादीमध्ये आहे. ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी किंवा त्यांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहे फक्त अशा महिलांचे नाव लाभार्थी यादीमध्ये नाही. ही यादी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती सुद्धा अपलोड करण्यात आलेले आहे. तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती जाऊन ही यादी चेक करू शकता. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी यादी आहे.
यादी कशाप्रकारे चेक करावी
यादीमध्ये तुमचे नाव तपासण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यातील नगरपालिकेचे नाव किंवा महानगरपालिकेचे नाव गुगल वरती सर्च करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला या अधिकृत वेबसाइट वरती जाऊन तुमच्या जिल्ह्यातील पात्र महिलांची यादी तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे. मात्र ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे अशा सर्व महिलांची नावे त्या यादीत तुम्हाला बघायला मिळणार आहे.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म Approved झाला असेल किंवा पेंडिंग असेल तर लवकर करा आहे काम.!
Joe to cheak लड़की बड़ी योजना
वरील दिलेल्या स्टेप फॉलो करून तुम्ही सविस्तर माहिती चेक करू शकता