लाडकी बहीण योजनेचा फॉर्म Approved झाला असेल किंवा पेंडिंग असेल तर लवकर करा हे काम.! (Ladki bahini Yojana form approved)

Ladki bahini Yojana form approved : तुम्हीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर ही माहिती व्यवस्थित रित्या शेवटपर्यंत वाचा. काही बहिणींचे फॉर्म झालेले असून काही बहिणीचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहे तर आता यापुढे काय करायचे याबाबतची सविस्तर माहिती आपण समजून घेऊया.

फॉर्म Approved झाले असेल तर हे काम करा (Ladki bahini Yojana form approved)

ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह करण्यात आलेले आहे. अशा महिलांनी एक वेळेस आपले बँक खाते आपल्या आधार कार्ड सोबत लिंक आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या कोणत्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले आहे याची माहिती सहजरीत्या समजेल. याकरता तुम्हाला गुगल सर्च वरती जाऊन Aadhar login अशाप्रकारे सर्च करून घ्यायचे आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली सुद्धा भेटून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही वेबसाईट ओपन करू शकता.

  • वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे Aadhar Login बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून कॅपच्या कोड टाकून घ्यायचा आहे आणि लॉगिन विथ ओटीपी या बटणावर क्लिक करून घ्यायचे आहे.
  • यानंतर तुमच्या आधार कार्ड नंबर ला लिंक असलेल्या मोबाईल वरती तुम्हाला ओटीपी मिळेल तो ओटीपी तिथे टाकून तुम्हाला व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.
  • ही संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्हाला Bank seeding status यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे.
  • यानंतर आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी कुठली बँक लिंक आहे याची माहिती दाखवली जाईल. कारण भविष्यामध्ये येणारे पैसे तुम्ही तुमचा अंगठा स्कॅन करून कुठेही काढू शकता. आणि तुम्हाला समजण्यासाठी सुद्धा सोयीस्कर होईल की तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचे कुठले बँक खाते लिंक आहे. यामुळे महिलांचा गोंधळ होणार नाही.
Ladki bahini Yojana form approved
Ladki bahini Yojana form approved
WhatsApp Group Join Now

तुमच्या बँकेला आधार लिंक आहे का इथे चेक करा

ज्या महिलांचे स्टेटस रिजेक्ट किंवा पेंडिंग झाले असेल त्यांनी काय करावे?

ज्या महिलांचे अर्ज पेंडिंग असे दाखवत आहे. त्या अर्जांची सध्या पडताळणी सुरू असून लवकरात लवकर त्याबाबत तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती मेसेज पाठवला जाईल. मात्र ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे अशा सर्व महिलांना सरकारकडून फॉर्म एडिट करण्यासाठी फक्त एकच संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे फॉर्म एडिट करून भरताना काळजीपूर्वक भरावा व सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.

अर्ज रिजेक्ट होण्याची कारणे

बऱ्याच महिलांचे अर्ज रिजेक्ट होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक नसल्यामुळे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टीची सर्वात अगोदर पडताळणी करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्याशी तुमचा मोबाईल नंबर तसेच आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या. असे नसेल तर तुमचे सर्वात अगोदर आधार कार्ड तुमच्या बँक सोबत लिंक करून घेणे गरजेचे आहे.

तुमचा अर्ज Reject झाला असेल तर इथे क्लिक करा

अर्ज Approved झालेल्या महिलांना पैसे केव्हा मिळणार ?

ज्या महिलांचे अर्ज Approved झालेले आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जुलै व ऑगस्ट महिन्याचे दोन्ही मिळून ३००० रुपये एकत्रित वितरित करण्यात येणार आहे. हे पैसे महिलांना डीबीटी अंतर्गत त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे रक्षाबंधनच्या दिवशी जमा होतील असे सांगितले जात आहे.

सहकार्य करा : ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना योग्य ती माहिती समजेल. व बाकी महिलांचा सुद्धा गोंधळ होणार नाही.

तुमच्या खत्यात पैसे केव्हा जमा होणार इथे बघा

1 thought on “लाडकी बहीण योजनेचा फॉर्म Approved झाला असेल किंवा पेंडिंग असेल तर लवकर करा हे काम.! (Ladki bahini Yojana form approved)”

Leave a Comment