लखपती दीदी योजना: महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत, पात्रता व अर्ज प्रक्रिया (Lakhpati Didi Yojana)

Lakhpati Didi Yojana : निवडणुका जवळ आल्यामुळे महिलांसाठी सरकारकडून नवनवीन योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. सद्यस्थितीत राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची चांगली चर्चा सुरू असून या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा1500 रुपये वितरित केले जाणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात ही मध्य प्रदेश सरकारने सर्वात अगोदर केली होती. सध्या स्थितीमध्ये एकूण सात राज्यात महिलांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत करणाऱ्या अशाच प्रकारच्या योजना राबवल्या जात आहे. सद्यस्थितीमध्ये राज्यात लाडकी बहिणी योजनेला उदंड प्रतिसाद मिळत असतानाच केंद्र सरकारकडून लखपती दिली योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत प्राप्त करून दिली जाणार आहे. यामुळे ही योजना काय आहे ? या योजनेचे स्वरूप काय असून याचा लाभ कुणाला मिळणार आहे? याविषयीची सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत

लखपती दीदी योजनेचा मुख्य उद्देश काय? (Lakhpati Didi Yojana)

केंद्र सरकार द्वारे आतापर्यंत महिलांकरता विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहे. गेल्या मागील काही वर्षांपासून महिला सशक्तिकरणावरती मोठी भर दिली जात आहे. महिलांची आर्थिक तसेच सामाजिक प्रगती व्हावे याकरता सरकार द्वारे मोठा प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून सरकारद्वारे लखपती दीदी योजना राबवली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार द्वारे ही योजना चालू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार तर्फे (Lakhpati Didi Yojana) महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज प्राप्त करून दिली जाते. यामुळे महिला वर्गामध्ये स्वतःचे स्वप्न पूर्ण करून आर्थिक बळकट होण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे.

Lakhpati Didi Yojana
Lakhpati Didi Yojana
WhatsApp Group Join Now

पाच लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार

या योजनेचा सर्वात मोठा लाभ बचत गटांची जोडल्या गेलेला महिलांना होणार आहे. कारण ही योजना बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्याकरता चालू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हायला हवी असाही या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना कौशल्य तसेच विकास प्रशिक्षण देण्यात येते. यानंतर महिलांना स्वतःचा उद्योग उभारण्याकरता 1 लाख रुपयांपासून तर 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज प्राप्त करून दिले जाते.

योजनेचे नाव Lakhpati Didi Yojana
यांच्या द्वारा केंद्र सरकारकडून
लाभ 5 लाख रुपये
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

या योजनेचा लाभ घेण्याकरता नेमकी अट काय?

ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना काही अटी पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. यामध्ये प्रमुख महत्त्वाची अट म्हणजे अर्जदार महिलांच्या घरामध्ये कुठलीही व्यक्ती शासकीय नोकरदार नसायला हवा. तसेच अर्जदार महिलांच्या कुटुंबामध्ये वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवे. अशा सर्व महिला या योजने करता पात्र ठरणार आहे.

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या तारखेपासून अनुदान वितरणास सुरुवात.!

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा?

लखपती दीदी योजने करता अर्ज करायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या अंतर्गत एका उद्योगाचे नियोजन करणे आवश्यक असणार आहे. या उद्योगाचा आराखडा सरकारकडे पाठवला जाईल. त्याचप्रमाणे लखपती दीदी योजनेच्या अंतर्गत अर्जाची सरकार पूर्णतः पडताळणी करेल. त्यानंतर सर्व अटींची पूर्तता व्यवस्थितरित्या केलेली असेल तर पात्र महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. अशाप्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळू शकतात.

Leave a Comment