Maharashtra weather updates : राज्यामध्ये परतीच्या पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे.येणाऱ्या पुढील 3-4 दिवसांमध्ये पावसाची मोठी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून मराठवाडा तसेच विदर्भासह इतर ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आलेली आहे.
पुढील 4 दिवस या भागात मुसळधार पाऊस
मराठवाडा कोकण विदर्भामध्ये हवामान खात्याद्वारे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. राज्यातील या भागात मंगळवारपासून पुढील चार दिवस वादळी पावसाचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. सध्या स्थितीमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले असल्यामुळे या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मानसून ने पश्चिम राजस्थान पासून परतीच्या पावसाला सुरुवात केलेली असून मान्सून आता गुजरात मधील कच्छ भागापर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे.
पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस
यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा 24 तासांमध्ये तयार होणार असल्याचे हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. परिणामी राज्यांमधील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज सुद्धा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. याच दरम्यान राज्यांमधील काही जिल्ह्यांना ऑरेंज कलर तर काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो लक्झरी करण्यात आलेला आहे. सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार पालघर ठाणे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर पुणे सांगली सोलापूर संभाजीनगर लातूर जालना धाराशिव बुलढाणा अमरावती चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर परभणी सातारा बीड हिंगोली नांदेड येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे.