अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी 237 कोटींचा मदत निधी मंजूर; भरपाई कुणाला मिळे,जाणून घ्या.! (Nuksan Bharpai)

Nuksan Bharpai राज्य सरकारकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता 237 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे. यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील जून ते ऑगस्ट 2024 या दरम्यान अतिवृष्टी झाल्याचे दिसून आले होते. यामुळे नुकसानग्रस्त जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकरिता मदतीची मागणी करण्यात आलेली होती. त्यामुळे सरकार द्वारे 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकरिता दिलासा देणारा शासन निर्णय सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर शासन निर्णय काय आहे आणि कोणती 12 जिल्हे यामध्ये समाविष्ट आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

या बारा12 जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई (Nuksan Bharpai)

शासनाकडून 12 जिल्ह्यांकरता नुकसान भरपाईची घोषणा करण्यात आलेली असून याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. यामध्ये बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम सांगली सातारा पुणे नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा या एकूण 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.यामध्ये सर्वाधिक निधी नागपूर विभागाकरता 187 कोटी 29 लाख 96 हजार रुपये तसेच पुणे विभागाकरिता 16 कोटी 56 लाख 82 हजार रुपये व तसेच अमरावती विभागाकरता 33 कोटी 20 लाख 35 हजार रुपयांची तरतूद या अंतर्गत करण्यात आलेली आहे.

Nuksan Bharpai 2024

राज्य सरकार द्वारे एक जानेवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार जिरायत तसेच बागायत आणि बहुवार्षिक पिकांकरिता सुधारित दराने जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्याद्रीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्याचप्रमाणे (Nuksan Bharpai) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट डीबीटी अंतर्गत ही रक्कम जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आता जून ते ऑगस्ट महिन्या दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता मोठा दिलासा मिळणार आहे.

शासन निर्णय बघण्यासाठी इथे क्लिक करा

यामध्ये अतिवृष्टी पूर चक्रीवादळ आणि सततच्या नुकसानग्रस्त पावसामुळे शेती पिकाचे झालेले मोठ्या प्रमाणात नुकसान बघता (Nuksan Bharpai) निविष्ठा अनुदान स्वरूपामध्ये शेतकऱ्यांनाही मदत देण्यात येत आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर विभागीय आयुक्तांद्वारे अधिकच्या निधी प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आलेला आहे. या प्रस्तावाच्या नुसार राज्य सरकार द्वारे ही मदत मंजूर करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ; आता शेतकऱ्यांना विहीर शेततळे वीज जोडणी करता अनुदानामध्ये वाढ.!

याच दरम्यान मराठवाड्यामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे तसेच कापूस पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामुळे या विभागातील शेतकऱ्यांच्या हत्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे.त्यामुळे शेतकरी वर्गांमधून तातडीची मदतीची मागणी केली जात आहे. परंतु तातडीने मदत देण्याबाबतचा निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही.सरकार फक्त घोषणा करते मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा होत नाही अशा प्रकारची तक्रार शेतकरी करत आहे. शेतकरी मित्रांनो तुमचे सुद्धा नुकसान झालेले आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment