Pik Vima update 2024 : खरीप हंगाम 2023 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. यामुळे सरकारकडून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता दुसरा टप्पा म्हणून या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 76 कोटी 27 लाख रुपये अग्रीम पीक विमा निधी जमा करण्यात आलेला आहे. याचा लाभ कोणते शेतकऱ्यांना मिळाला आहे? कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पहिल्या टप्प्यामध्ये नोव्हेंबर 2022 या महिन्यात सात लाख 70 हजार शेतकऱ्यांना 241 कोटी रुपये अग्रीम पिक विमा वाटप करण्यात आलेला होता. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये एक लाख 11 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रीम पीक विम्याची उर्वरित रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली आहे.
बीड जिल्ह्याला तालुका निहाय अग्रीम पीक विमा वाटप (Pik Vima update 2024)
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर बीड जिल्ह्यामधील विविध तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रीम पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांना याचा लाभ किती मिळाला आहे याविषयीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आपण जाणून घेऊया.
तालुक्याचे नाव | मिळालेली रक्कम | पात्र शेतकरी |
अंबाजोगाई | 12 कोटी 26 लाख रुपये | 12391 |
बीड | 5 कोटी 22 लाख रुपये | 7171 |
आष्टी | 1 कोटी 49 लाख रुपये | 2535 |
धारूर | 3 कोटी 86 लाख रुपये | 3541 |
गेवराई | 3 कोटी 44 लाख रुपये | 5446 |
केज | 13 कोटी 7 लाख रुपये | 19125 |
माजलगाव | 14 कोटी 13 लाख रुपये | 19027 |
परळी | 16 कोटी 57 लाख रुपये | 25125 |
पाटोदा | 06 कोटी 90 लाख रुपये | 8877 |
शिरूर | 62 कोटी 85 लाख रुपये | 29320 |
वडवणी | 01 कोटी 47 लाख रुपये | 5401 |
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या तारखेपासून अनुदान वितरणास सुरुवात.!
बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये एकूण एक लाख 11 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती 76 कोटी सत्तावीस लाख रुपये अग्रीन पीक विमा निधी जमा करण्यात आलेला आहे. या निधीचे वाटप तालुका आणि शेतकऱ्यांच्या संख्येनुसार वाटप करण्यात आलेले आहे. 2023 मध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याचे दिसून आले होते. त्याकरता शेतकऱ्यांना (Pik Vima update 2024) आर्थिक मदत म्हणून हा अग्रीम पीक विमा सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम डीबीटी द्वारे ट्रान्सफर करण्यात आलेली आहे.
यादीत नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा
बीड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडल्यामुळे आता त्यांना पिक विमा मिळालेला असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत झालेली आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. तसंच हा निधी योग्य वेळेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.
Parbhani jila ka partner