PM Awas Yojana : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सध्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारकडून नवनवीन योजनांची पूर्तता केली जात आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातर्फे प्रधानमंत्री आवास शहरी 2.0 योजनेला आता मंजुरी मिळालेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी भागात पाच वर्षांमध्ये (2024 -25 ते 2028-29) कमी किमतीमध्ये घरे बांधणे तसेच घरे खरेदी करण्याकरिता आर्थिक साह्य प्रदान केले जाईल.
1 कोटी शहरी गरीब तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा मोठा फायदा होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही एक केंद्र सरकारचा महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे जो शहरी भागामधील प्रत्येक पात्र व्यक्तीला पक्के घरे देण्याकरता मोठी मदत करणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब व ज्यांना घरकुलाची आवश्यकता आहे अशा कुटुंबांना याची मदत मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेची वैशिष्ट्ये (PM Awas Yojana)
प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांकरता घराच्या बांधकामासाठी आर्थिक सहाय्य प्राधान्य करून देण्यात येईल. मैदानी भागांमधील 1.2 लाख रुपये आणि ईशान्यकडील राज्य आहेत त्यांच्याकरता तसेच आणि हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू कश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांसारख्या डोंगराळ राज्यामधील 1.3 लाख रुपयांची मदत वितरित केली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शहरी भागामध्ये राहणाऱ्या कमी उत्पन्न तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांच्या फायद्या करता एकूण 10 दशलक्ष निवासी युनिटच्या बांधकामाची सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारच्या महत्वकांशी प्रकल्पामध्ये 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक सुद्धा करण्यात आलेली आहे. ज्या मध्ये 2.3 लाख कोटी रुपयांच्या सरकारी अनुदानाचा समावेश करण्यात आलेला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एकूण 1.18 कोटी घरे अधिकृत करण्यात आलेली आहे. यांच्यापैकी 85.5 लाखांपेक्षा अधिक घरे यशस्वीरित्या बांधण्यात सुद्धा आलेली आहे. आणि तसेच जे योग्य लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत हे सुपूर्द करण्यात आलेली आहे.
हे पण वाचा : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: 3 मोफत गॅस सिलेंडर;असा मिळवा लाभ.!
EWS कुटुंबाला याचा फायदा होणार (PM Awas Yojana)
EWS कुटुंब ही अशा प्रकारची कुटुंबे ज्याचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपयांपर्यंत आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, शहरामध्ये राहणाऱ्या दुर्बल घटकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मध्यमवर्गीय कुटुंब स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न बघत आहे मात्र ते पूर्ण करण्याचे काम आता सरकार करणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांचे उत्पन्न कमी आहे त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न आता सरकार पूर्ण करणार आहे. या योजनेचा लाभ मध्यमवर्गीय कुटुंब तसेच गरीब कुटुंबांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.