Pm Kisan installment : केंद्र सरकारकडून पी एम किसान सन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे.शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पी एम किसान योजनेचे 17 हप्ते वर्ग करण्यात आलेले आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रत्येकी 34 हजार रुपये जमा करून देण्यात आलेले आहे. पी एम किसान योजनेच्या 18 व्या हत्याचे पैसे कोणत्या तारखेला खात्यात जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. परंतु आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा आठव्या हाताचा लाभ घ्यायचा असेल तर त्या अगोदर महत्त्वाची तीन कामे करावी लागणार आहे. याकरता ई केवायसी, आधार क्रमांक आणि बँक खाते लिंक करणे तसेच शेतजमिनीची पडताळणी करणे आवश्यक असणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या या तीन गोष्टी प्रलंबित असेल म्हणजेच अपूर्ण असतील तर त्यांनी या लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.
पी एम किसान योजनेचा हप्ता मिळण्या अगोदर काय करावे लागेल? (Pm Kisan installment)
पी एम किसान योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2018 मध्ये करण्यात आलेली होती. पी एम किसान सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येक चार महिन्याला 2000 रुपये याप्रमाणे मिळून वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. आतापर्यंतची शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17 हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटी अंतर्गत जमा केले जात असतात. तसेच आता शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याची रक्कम मिळण्या अगोदर या शेतकऱ्यांना ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली इकेवासी प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नसेल अशा शेतकऱ्यांनी ती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असणार आहे.
ई केवायसी कशाप्रकारे करावी? (Pm Kisan installment)
ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी प्रक्रिया प्रलंबित आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आपली केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. पी एम किसान सन्मान योजनेअंतर्गत 18 व्याप्ती ची रक्कम खात्यामध्ये जमा होण्याकरता ही अट शासनाकडून अत्यावश्यक करण्यात आलेली आहे. तुम्हाला सुद्धा तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर तुम्ही जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. अथवा पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सुद्धा ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार? (Pm Kisan installment)
पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान योजनेचा 17 वा हप्त्याची रक्कम 18 जून रोजी जमा करण्यात आलेली होती. तसेच आता अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा सर्वच शेतकऱ्यांना लागून आहे. हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे दोन हजार रुपये जमा करण्याचा निर्णय असू शकतो.
https://twitter.com/pmkisanofficial/header_photo
याच दृष्टिकोनातून पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याकरता पीएम किसान ई मित्र सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. हा एक चाट बोट असून असून याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्याकरता प्रयत्न केले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही सुविधा 24 तास सुरू असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी फायदा होणार आहे. या सुविधेचा लाभ तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या करू शकता.