पी.एम. किसान पोर्टल वर चुकीचा नंबर नमूद केला ; आता घरबसल्या मोबाईल वरून नवीन नंबर अपडेट करा.! (PM Kisan Number Change)

PM Kisan Number Change : पी एम किसान योजने करता पोर्टलवर चुकीचा नंबर नमूद करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण अशा सर्व शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट पर्यंत संकेतस्थळावरती जाऊन आपल्या चुकीच्या मोबाईल क्रमांकाची दुरुस्ती करता येणार आहे. पी एम किसान योजने करता जेवढे लाभार्थी शेतकरी आहेत ते या संकेतस्थळावरती आपला नवीन मोबाईल क्रमांक अपडेट करू शकता.

पी एम किसान योजने करता नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनी या अगोदर नोंदणी करताना आपला मोबाईल क्रमांक अनेक नोंदणीसाठी वापरण्यात आलेला आहे तसेच पोर्टलवर डाटा अपलोड करत असताना चुकीचे मोबाईल क्रमांक देखील लाभार्थ्यांनी नोंदणी केल्याचे निदर्शनास आलेले आहे. चुकीचा मोबाईल क्रमांक नोंदणी केल्यामुळे शेतकरी पीएम किसान च्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अशा लाभार्थींना केंद्र शासनाने पीएम किसान पोर्टल वरील लाभार्थींची डुबलीकेट असलेले मोबाईल क्रमांक दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याकरता 31 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी खात्याला आधार क्रमांक सलग्न केलेला नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीएम किसान आणि राज्य शासनाच्या नमो सन्मान योजनेचा अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी ई केवायसी करावी तसेच बँक खात्याला आधार क्रमांक जोडावा किंवा पोस्ट बँक खाते काढावे. अशा प्रकारचे आव्हान कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

अशाप्रकारे करा नवीन मोबाईल क्रमांक अपडेट (PM Kisan Number Change)

  • शेतकऱ्यांनी सर्वप्रथम केंद्र शासनाच्या https://pmkisan.gov.in/ या वेबसाईट वरती क्लिक करून घ्यायचे आहे

PM Kisan Number Change
WhatsApp Group Join Now
  • यामध्ये तुम्हाला फार्मर कॉर्नर मध्ये Update Mobile Number (PM Kisan Number Change) अशा प्रकारचे ऑप्शन बघायला मिळेल. यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे.

PM Kisan Number Change
  • अपडेट मोबाईल नंबर ही विंडो ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार क्रमांक टाकल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक अपडेट करून घ्यावा लागणार आहे.
  • याकरता दिलेल्या फोटोमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. कारण ही माहिती एकदम सोपी असून प्रत्येकाला मोबाईल क्रमांक अपडेट करणे ही प्रक्रिया सुद्धा समजून घेणे सोपे आहे.

31 ऑगस्ट पर्यंत करता येणार दुरुस्ती (PM Kisan Number Change)

PM Kisan Number Change

सर्व शेतकऱ्यांनी पीएम किसान च्या पोर्टलवर नोंदणीला चुकीचा मोबाईल क्रमांक अपडेट करण्याची सुविधा केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. याकरता लाभार्थी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत पीएम किसान च्या पोर्टलवर लॉगिन करून उपरोक्त निर्देशाप्रमाणे आपला मोबाईल क्रमांक दुरुस्ती करून घ्यावा तसेच ई केवायसी आणि बँक खात्याला आधार क्रमांक सलग्न करून योजनेचा लाभ घ्यावा.

हे पण वाचा : ई पिक पाहणी : सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या.!

तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा

ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान च्या पोर्टलवर आधी चुकीचा मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे अशा शेतकऱ्यांना या पोर्टलवर मोबाईल क्रमांक बदलण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार काही अडचणी येत असतील तर त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन विस्तृत माहिती मिळू शकणार आहे.

Leave a Comment