Rabbi Pik Vima : शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे वेळोवेळी शेतामध्ये झालेले मोठे नुकसान सहन करावे लागते. काही वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम सरकारकडून जमा करण्यात येते. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप दमडी सुद्धा मिळालेली नाही. आतापर्यंत काही मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहे.
मागील गेल्या खरीप हंगामामध्ये तसेच रब्बी हंगामामधील पिक विमा संदर्भातली वाट शेतकरी अजून सुद्धा बघत आहे. मागच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना विक्रमी 7396 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती. मात्र मंजूर करण्यात आलेल्या एकूण रकमेपैकी तब्बल 5261 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. उर्वरित 2135 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करणे अजून सुद्धा बाकी आहे. यामध्ये बहुतांश रक्कम ही 6 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे आहे.
रब्बी हंगामा करता 400 कोटी रुपयांची भरपाई सरकारकडून देण्यात आलेली होती.रब्बी मधील सर्वसाधारण जवळपास सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली होती. मात्र खरीप हंगामा मधील 2135 कोटी रुपयांची भरपाई कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि का रखडलेली आहे? तसेच शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई कधी मिळणार याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
कुठल्या विमा कंपनीकडून किती पैसे बाकी? (Rabbi Pik Vima)
शेतकऱ्यांना देण्यात येणारे रखडलेले नुकसान भरपाई मध्ये एकूण रकमेपैकी 2092 कोटी रुपये हे ओरिएंटल कंपनीकडे आहेत. ओरिएंटल कंपनीची विमा भरपाई ही 110% पेक्षा जास्त झालेली आहे. बीड पॅटर्नच्या अनुसार 110% पेक्षा जास्त भरपाई देणे असल्यास राज्य सरकारला वाढलेली भरपाई आता त्यांना द्यावी लागणार आहे. यामुळे खरीप 2023 मधील ओरिएंटल कंपनीकडे असलेल्या सहा (Rabbi Pik Vima) जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई रखडलेली आहे.
खालील जिल्ह्यांना मिळणार पीक विम्याचे पैसे (Rabbi Pik Vima)
ज्या जिल्ह्यांची नुकसान भरपाई रखडलेली आहे यामध्ये जिल्हे आहेत चंद्रपूर,जळगाव,नाशिक,नगर,सोलापूर आणि सातारा या सहा जिल्ह्यांचा पिक विमा अजून बाकी आहे. तर या शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यावर ती पिक विम्याची रक्कम जमा करणे जाणार आहे. याकरता राज्य सरकारकडे आलेली भरपाई दिल्यानंतर शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावरती वर्ग करून मिळणार आहे.(Rabbi Pik Vima)
आपण बघत आहोत की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटप झालेली आहे तसेच काही शेतकरी अजून सुद्धा वाट बघत आहेत तरी केवळ 6जिल्ह्यांमधील पिक विमा आता रखडलेला आहे. कारण हे जिल्हे ओरिएंटल कंपनीकडे सपोर्ट करण्यात आल्यामुळे या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई बाकी आहे अन्यथा आतापर्यंत इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे.
विहिरीसाठी मिळणार 5 लाखांपर्यंत अनुदान ; सविस्तर माहिती बघा.!
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये पाऊस कमी होता. त्यामुळे कोरडा दुष्काळ पडून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. यामुळे खरिपातील विक्रमी भरपाई मंजूर झालेली होती. त्याप्रमाणे बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करून सुद्धा झालेली आहे. यापुढे चहा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या खात्यावरती वर्ग करून मिळणार आहे. ज्यांची अद्यापही प्रकरणे प्रलंबित आहे अशा मोजक्या शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा करून मिळणार आहे
रब्बी हंगामासाठी नुकसान भरपाई (Rabbi Pik Vima)
आपण जर रब्बीचा विचार केला तर रब्बी हंगामा करता शेतकऱ्यांना खूपच कमी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. खरीप हंगामासाठी 7396 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली होती. तसेच रब्बी हंगामामध्ये केवळ 400 कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झालेली होती. म्हणजे एकंदरीत आपण बघितले तर खरीप हंगामामध्ये जेवढी नुकसान भरपाई मिळालेली आहे. त्याच्या अल्पशा प्रमाणात रब्बी हंगामासाठी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली आहे. परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अगदी नगण्य मिळाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली रक्कम ही खूपच कमी आहे.काही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या क्षेत्रानुसार 35 हजार 40 हजार 60000 किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम सुद्धा मिळाली आहे. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1000 रुपयांपेक्षा कमी सुद्धा रक्कम मिळालेली आहे. तसेच काही शेतकऱ्यांना नुकसान होऊन सुद्धा अद्याप रक्कम मिळालेली नाही. ज्या शेतकऱ्यांना अद्यापही रक्कम मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.