Rain Update : काही दिवसांपासून राज्यामध्ये सर्व दूर पावसाने चांगलीच सुरुवात केली होती. मात्र मागील काही दिवसांपासून काही भागांमध्ये पावसाचा जोर थंडावला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यामध्ये काही भागात आज पावसाचा जोर वाढणार असून पुन्हा पावसाचे जोरदार आगमन होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे राज्यामधील काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. इतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
या भागांमध्ये जोरदार पाऊस (Rain Update)
राज्यातील काही भागांमध्ये पावसासह आणखी एका मोठ्या संकटाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. यामध्ये नांदेड, धाराशिव, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलक्या सरीसह सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे. तसेच पुण्यामध्ये आज ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.
जुलै च्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच विश्रांती घेतल्याचे चित्र आपल्याला दिसले होते. परंतु मुंबईसह उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सतत बरसत होत्या. पाऊस ओसरल्यामुळे पुन्हा एकदा उकडा जाणवायला सुरुवात झालेली आहे. परंतु पुढील काही दिवसांमध्ये मुंबई तसेच ठाणे पालघर या भागामध्ये हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आलेला आहे.
शहर परिसरामध्ये ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही भागात पाऊस सुरू झालेला होता. परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये बऱ्याच दिवस पावसाने दांडी मारल्याचे चित्र काही भागांमध्ये दिसून आले होते. यामुळे मुंबईकर तसेच इतर भागांमध्ये सुद्धा नागरिकांना उकडा जाणवत होता. याच दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये अशी स्थिती कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु काही भागांमध्ये हलक्या सरी कोसळणार असून संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील. त्याचप्रमाणे काही भागांमध्ये पाऊस होईल तर काही भागात कोरडे वातावरण असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला आहे.
हे पण वाचा : जिल्हा परिषद योजनेअंतर्गत शिलाई मशीन, सायकल व ताडपत्रीचे वाटप सुरु