Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यांमधील महिलांच्या आर्थिक समीक्षा करण्याकरता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेले आहे. ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची सुरुवात महाराष्ट्रातील महिलांकरता सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना खूप कमी टायमामध्ये खूप जास्त प्रचलित झाल्याचे दिसून येत आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्रातील असंख्य महिलांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे.
या योजनेच्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना स्थैर्य प्रदान करण्याचे काम ही योजना करत आहे. महिलांच्या दैनंदिन जीवनामधील अडचणी या योजनेच्या अंतर्गत दूर होणार अशी अपेक्षा बाळगली जात आहे. या योजनेअंतर्गत महिला आर्थिक स्वावलंबी बनण्यासाठी मोठी मदत होणार आहे. ग्रामीण भागामधील ज्या महिला आर्थिक दुर्बल घटकांमध्ये मोडल्या जातात आणि त्या दैनंदिन इतरांवरती अवलंबून आहेत अशा महिलांसाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी तसेच लाभ (Ladki Bahin Yojana)
महाराष्ट्र सरकार तर्फे राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांकरिता दरमहा १५०० रुपये पात्र महिलांना वितरित केले जाणार आहे. हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये थेट डीबीटी च्या माध्यमातून वर्ग केले जात आहे.
योजनेअंतर्गत सुरुवातीपासून जुलै तसेच ऑगस्ट 2024 या दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये पात्र महिलांच्या खात्यावरती आतापर्यंत जमा करण्यात आलेले आहे. आतापर्यंत एकूण 1 कोटी 59 लाख लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. तसेच राज्य सरकारने महिलांकरता 4787 कोटी रुपयांची आर्थिक सहाय्य आतापर्यंत वितरित केले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज बाबत माहिती (Ladki Bahin Yojana)
- या योजने करता अर्ज करण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या मदतीने अर्ज भरावा लागणार आहे
- यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागणार आहे. शक्यतो आतापर्यंत सर्वांनाच माहिती आहे की या योजनेसाठी कुठली कागदपत्रे आवश्यक आहे. तुम्हाला जर माहिती नसेल तर आपल्या वेबसाईट वरती याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल.
- अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांना नियमितपणे दरमहा त्यांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा करण्यात येणार आहे
- या योजनेसाठी अर्ज करण्याकरता सरकारकडून नेहमीच तारीख वाढवण्यात आलेली असून आता शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 अशी करण्यात आलेली आहे.
योजनेसाठी प्रमुख आव्हाने तसेच उपाययोजना (Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने करता शासनाला काही प्रमुख आव्हाने समोर आलेली आहेत यावरती उपाय योजना म्हणून सरकारने खालील बाबी अवलंबले आहे.
- प्रथम गैरप्रकार कमी करणे : काही दिवसा अगोदर एक प्रकरण समोर आलेले असून एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावरती 30 अर्ज दाखल केलेले होते. त्यापैकी 26 अर्ज मंजूर सुद्धा करण्यात आलेले होते.
- अर्ज मंजुरीची प्रक्रिया सुधारणे : यामध्ये आतापर्यंत 11 प्रकारच्या अधिकृत व्यक्तींना अर्ज मिळून दूर करण्याचे अधिकार देण्यात आलेले होते.ज्यामध्येअंगणवाडी सेविका, आशा वर्कर, समूह संघटक,ग्रामसेवक इत्यादी.
लाडक्या बहिणीचे 3000 मिळाले नाही ; हे काम करा आणि पैसे खात्यात जमा.!
उपायोजना : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेमधील गैरप्रकार रोखण्यासाठी व या योजनेमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी तथापि तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे अर्ज मंजुरीच्या प्रक्रियेला थोडा अधिक वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात करण्यात आलेले असून आताही अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात येणार आहे
पुढील हप्ता कधी जमा होणार?
आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने करता ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे. मात्र ज्या महिला पात्र असून सुद्धा त्यांच्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही अशा महिलांना एकूण तीन हप्त्याचे 4500 हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मात्र हे पैसे केव्हा जमा होणार याची अधिकृत माहिती सरकारकडून प्राप्त झालेली नसून सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार 19 सप्टेंबर नंतर महिलांच्या खात्यामध्ये पुढील हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असे सांगितले जात आहे.मात्र लवकरच पुढील हप्त्याचे पैसे केव्हा जमा होतील याबाबतची माहिती राज्य सरकारकडून घोषित केली जाईल. त्यामुळे कुठल्याही अफवांवर लक्ष न ठेवता ज्या महिला पात्र आहे त्यांच्या खात्यावर ती वेळेत पैसे जमा होतील असे सांगण्यात येत आहे.