Soybean kapus anudan : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे शेतकरी अनेक दिवसापासून 2023 खरीप हंगामा मधील सोयाबीन व कापूस अनुदानाची वाट बघत आहे. अशा शेतकऱ्यांना आता आनंदाचा धक्काच बसणार आहे. कारण 26 सप्टेंबर पासून अनुदानाचे पैसे खात्यात जमा होणार आहेत. अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. कृषी विभागामधील अधिकाऱ्यांची गुरुवारला बैठक झालेली असून या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलताना ही माहिती त्यांनी दिली आहे.
धनंजय मुंडे काय म्हणाले? या तारखेला पैसे जमा होणार (Soybean kapus anudan)
पत्रकार परिषद झाल्यानंतर धनंजय मुंडे म्हणाले की सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान तसेच दोन हेक्टर च्या मर्यादेमध्ये देण्याची कार्यवाही 26 सप्टेंबर पासून करण्याच्या सूचना कृषी विभागाद्वारे देण्यात आलेल्या आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की मोदींच्या उपस्थितीमध्ये या अनुदानाची वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती करण्यात येणार आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाशिम जिल्ह्यामध्ये नियोजित दौरा आखण्यात आलेला आहे. त्यांच्या दौऱ्याची तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नाही मात्र हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहे. पत्रकारांशी बोलताना यावेळी धनंजय मुंडे यांनी माहिती दिली.
राज्यामधील सोयाबीन तसेच कापूस खातेदारांची संख्या ही 96.17 लाख एवढी आहे. त्यापैकी 75.31 लाख शेतकऱ्यांची क्षेत्रीय स्तरावर संमती पत्र कृषी विभागाला देण्यात आलेली आहे. त्यापैकी 64.87 लाख शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर भरण्यात आलेली आहे. त्यामधील नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माहिती सोबत 46.8 लाख शेतकऱ्यांची माहिती जुळवली गेली आहे. तसेच ईपी पाहणीच्या माहितीमध्ये 36 लाख शेतकऱ्यांची नावे जुळवण्यात आलेली आहे. मात्र उर्वरित दहा लाख शेतकऱ्यांची नावे प्रत्यक्ष पडताळणी करून जुळवावी लागणार आहेत अशा प्रकारची माहिती कृषी विभागाद्वारे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
सोयाबीनची हमीभाव दराने खरेदी (Soybean kapus anudan)
केंद्र सरकारकडून नाफेड तसेच एनसीसीएफच्या माध्यमांतर्गत 18 लाख टर्म सोयाबीन हमीभावा द्वारे खरेदी करण्यात येणार आहे. दहा दिवसानंतर सोयाबीन खरेदी करता केंद्र सुरू व्हावी याकरता कृषी आणि पणन विभागाच्या अधिकाऱ्याद्वारे बैठक घेतली गेली आहे. राज्यामध्ये सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू करण्याचे काम गतीने पूर्ण करावे. अशा प्रकारच्या सूचना सुद्धा मुंडे यांनी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपन्यांना सोयाबीन केंद्र सुरू करण्याकरता परवानगी द्यावी. जेणेकरून शेतकऱ्यांना सोयाबीन केंद्र कमी अंतरावर उपलब्ध होतील असे सुद्धा मुंडे यांनी सांगितलेले आहे. यावर्षी सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता सरकारी खरेदी करणार आहे.
याच दरम्यान सोयाबीन कापूस अनुदानाची शेतकरी मागील दोन आठवड्यापासून वाट बघत आहे. या अगोदर 10 सप्टेंबर पासून अनुदान जमा करा अशा प्रकारच्या सूचना कृषीमंत्र्यांनी दिलेल्या होत्या. मात्र अजून सुद्धा अनुदान जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. शेतकरी वर्गांमधून सरकार विरोधामध्ये फक्त शेतकऱ्यांना तारीख पे तारीख अशी पोकळ आश्वासने सरकार देत आहे अशा प्रकारच्या कमेंट्स पास केल्या जात आहे तर शेतकरी मित्रांनो यावरती तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.